पालकमंत्र्यांनी दिलासा न देता कृती करावी- वंचीत आघाडी 

file photo
file photo

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव जिल्हा व शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनासह सर्वजण भयभीत झहोत आहेत. अशा परिस्थितीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रय्तन केला. मात्र आता परिस्थिती दिलासा देण्यासारखी नसुन त्यावर ठोस पावले उचलण्याची वेळ आहे. दिलास देण्यापेक्षा कृती करावी असे आवाहन वंचीत बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहेमद यांनी केले आहे. 

कोरोना रुग्णांनी नियंत्रण व्यवस्था कोलमडली असून सर्वांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलेले आहे. पालकमंत्र्यांनी दिलासा देण्याची भाषा करण्याऐवजी थेट कृती करावी. बाधित व्यक्तींसह त्याच्या कुटुंबीय व नातेवाईकांना दिलासा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केले आहे. 

शासकीय रुग्णालयात खाटांची उपलब्धता नाही

जिल्ह्यात दररोज साडेतीनशे ते चारशे रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह येत आहे. लक्षणें असलेल्या रूग्णांसाठी आयसोलेशन सेंटर्समध्ये जागा उपलब्ध नाही. आणि घरी व्यवस्था नसल्यामुळे शेकडो रुग्ण मोकळे फिरत आहेत. ज्या रुग्णांना कोरोना झाला आहे मात्र ते न भिता ते बिनधास्त रस्त्यावर किंवा इतर्त्र फिरत आहे. तसेच होम आयसोलेशन केलेल्यांचे कोणतेही निरीक्षण होत नाही. अनेक रुग्ण नाईलाजास्तव मोकळे वावरत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांवर औषधोपचार व ऑक्सिजनसारखे घटक आवश्यक आहेत.  उपचारासाठी शासकीय रुग्णालयात खाटांची उपलब्धता नाही.

खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची होणारी लूट थांबवावी

गोरगरीब रुग्णांना खाजगी रूग्णालयात एक लाख भरल्याशिवाय ऍडमिट करत नाहीत. मग या रुग्णांनी कुठे जायचे. विष्णुपुरी येथील शासकिय वैद्यकीय रुग्णालयात आणखी खाटा वाढविल्या मात्र लगचे त्या काही तासांमध्येच फुल्ल झाल्या. शासकिय रुग्णालयात पुरेसा औषधसाठा, मनुष्यबळ व ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. शासकीय रुग्णालयाच्या २०० खाटांच्या इमारतीमध्ये पूर्ण क्षमतेने औषधसाठा व मनुष्यबळ उपलब्ध करून तात्काळ सुरू करावे.

या आहेत मागण्या

इतवारा येथील शंभर खाटांच्या आयुर्वेदिक रुग्णालयांच्या इमारतींची डागडुजी करून रुग्णालय सुरू करावे. ग्रामीण रुग्णालयात खाटा रिकाम्या असल्यास शहरातील रुग्णांना रुग्णवाहिकेतून तेथे पाठवावे. किमान एक हजार नवीन रुग्णांसाठी विलगीकरण सेंटर सुरू करावेत. होम क्वारंटाईन रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र डॉक्टरांची नियुक्ती करून त्यांचे मोबाईल क्रमांक सार्वजनिक करावेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाइकांची पुन्हा टेस्टिंग करावी अशी मागणी वंचित आघाडीने केली आहे.

पालकमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करणार

वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर सर्व खासदार, आमदारांच्या, पालकमंत्री व सर्व लोकप्रतिनिधींचे सर्व मोबाईल व निवासी नंबर सार्वजनिक करण्यात येतील. तसेच रुग्णांची हेळसांड थांबली नाही तर कोरोनाग्रस्तांना सोबत घेऊन पालकमंत्र्यांच्या घरावर आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com