नांदेड जिल्ह्यात आढळले साडेबारा हजारापेक्षा अधिक महुमेही रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महुमेही रुग्ण
जिल्ह्यात आढळले साडेबारा हजारापेक्षा अधिक महुमेही रुग्ण

नांदेड जिल्ह्यात आढळले साडेबारा हजारापेक्षा अधिक महुमेही रुग्ण

नांदेड : जागतिक मधुमेह दिवस म्हणून ता.१४ नोव्हेंबर हा दिवस पाळला जातो. मधुमेह दिवसाच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील पाच लाख ८८ हजार व्यक्तींची मधुमेह तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १२ हजार ९९९ व्यक्तींना मधुमेह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये दररोज मधुमेह तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

बदलत्या जिवनशैलीमुळे जगभारतील तरुणाईमध्ये मधुमेह आजाराची झपाट्याने वाढ होत आहे. यात अगदी २५ वर्षवयोगटातील तरुणाईचा देखील समावेश आहे. मधुमेह झालेल्या व्यक्तींमध्ये मूत्रपिंड, डोळे आणि पाय निकामी होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. मात्र जीवनशैलीतील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या मधुमेहावर औषधोपचार, डायलिसिस केंद्रांची निर्मिती, प्रत्यारोपण आशा विविध पातळ्यांवर औषधोपचार पुरविण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा: रत्नागिरी : जलतरण तलावा खुला, जलतरणपटूंची पाठ

परंतु तारुण्यात मधुमेह होऊ नये व मधुमेह आजारास दूर ठेवण्यासाठी तरुणाईंची जीवनशैली कशी असावी या बद्दल आरोग्य विभागाच्या वतीने पुरेशा प्रमाणात जनजागृती होताना दिसून येत नाही. त्यामुळे शासकीय आरोग्य केंद्रात आरोग्य समुपदेशकांमार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या मधुमेह आजारी रुग्णांवर मोफत औषध उपचार करण्यात आले. मधुमेह होण्याची कारणे आणि लक्षणे तसेच रूग्णांना मधुमेह होवू नये किंवा झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत समुपदेशन करण्यात आले. तसेच मधुमेह सप्ताह दिनानिमित्त ३० वर्षावरील व्यक्तींनी मधुमेह तपासणी करून घ्यावी, असे आवाहन शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

स्त्रियांमध्ये मधुमेहाचा धोका वाढता : पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये मधुमेहाचा धोका अधिक असल्याचे जगभरातील अनेक संस्था संघटना यांनी केलेल्या सर्वेक्षणातून स्पस्ट झालेले आहे. स्त्रीयांमध्ये नैराश्यग्रस्त असलेल्या महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक असते. हे देखील त्यातील एक मुख्य कारण मानले जाते. त्यामुळे महिलांनी गर्भधारणे दरम्यान तनावमुक्त रहावे असा अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.

अशी आहेत मधुमेहाची लक्षणे : - सतत तहान लागणे - सतत लघवी येणे - वजनात घट होणे - कुटुंबामध्ये मधुमेह असणे - जखम लवकर बरी न होणे

loading image
go to top