esakal | अर्धापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, केळीच्या बागा उद्ध्वस्त | Nanded News
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर (जि.नांदेड) : वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कापणीस आलेल्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तालुक्यातील गणपूर, कामठा, सावरगाव, कोंढा परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटाका बसला आहे.

अर्धापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, केळीच्या बागा उद्ध्वस्त

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) : तालुक्यात (Ardhapur) गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे खरिपाचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून‌ नेला आहे. या संकटातून सावरत असतानाच पुन्हा सोमवारी (ता.चार) दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain) झाल्याने कापणीस आलेल्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तालुक्यातील गणपूर, कामठा, सावरगाव, कोंढा परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटाका बसला आहे.सततच्या निसर्गाच्या संकटात शेतकरी भरडला जात आहे. अर्धापूर तालुक्यातील तिन्ही मंडळांत अतिवृष्टी झाल्याने कापणीस आलेले सोयाबीनसह कापूस, हळद आदी पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. या अस्मानी संकटातून शेतकरी (Nanded) सावरत असतानाच पुन्हा सोमवारी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्याचा काढणीस आलेल्या केळीच्या बागांना फटाका बसला आहे.

हेही वाचा: Skoda Auto ची भारतात ही कार दाखल, किंमत ११.९९ लाखांपासून सुरु

उभ्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाले असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटाका बसला आहे. वादळीवाऱ्यासह झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांना दिली. त्यांनी तातडीने तालुका प्रशासनास झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे आमच्या खरिपाच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा वादळी वाऱ्याचा तडाखा केळीच्या बागा बसला असून केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. आम्ही जगावे कसे हा प्रश्न आम्हाला पडला आहे? अशी प्रतिक्रिया परमेश्वर बंडाळे यांनी दिली.

हेही वाचा: फेसबुक व्हाट्सअ‍ॅप झालं डाऊन; नेटकरी हैराण

loading image
go to top