लोहा तालुक्यात पावसाचा हाहाकार, पुरात शेतकरी अडकला, दोन तासानंतर सुटका

बा.पु. गायखर 
Friday, 25 September 2020

तालुक्यातील आडगाव येथे आज झालेल्या ढगफुटीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे ग्रस्त शेतकऱ्यांचे शेतीचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत करण्यात यावेत.

लोहा ( जि. नांदेड ) : लोहा तालुक्यातील आडगाव, चितळी धानोरा मक्ता  येथे ढगफुटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गांधी नगर (धनोरा मक्ता ) येथील शेतकरी पुरात अडकले. दोन तासानंतर शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात यश आले. खरिप पिकांची पाहणी केली असता कापूस, सोयाबीन  पीके पाण्यात गेले आहेत. 

तालुक्यातील आडगाव येथे आज झालेल्या ढगफुटीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत करण्यात यावी. अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पुरातील एका झाडाचा आश्रय घेतला

गांधीनगर येथील शेतकरी गजानन बालाजी नागरगोजे हे लोहा येथील रुग्णालयात उपचारासाठी जात असताना अचानक ढगफुटी झाली आणि धानोरा येथील नदीच्या पुरात अडकला. त्यांनी पुरातील एका झाडाचा आश्रय घेतला तब्बल दोन तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

हेही वाचा -  हिंगोली : हरणाची शिकार करणाऱ्या सहा जणांना वन विभागाकडून कोठडी

विद्यार्थी आणि शिक्षक अचानक नदीला पूर आल्यामुळे अडकले

चितळी येथील शरद पवार विद्यालयाचे काही विद्यार्थी आणि शिक्षक अचानक नदीला पूर आल्यामुळे अडकले. या भागातील काबेगाव ,हिप्परगा, चितळी आणि देऊळगाव या गावाचा संपर्क तुटला आहे.

दापशेडचे सरपंच विरभद्र राजूरे यांनी निवेदनाद्वारे मागणी

लोहा तालुक्यातील दापशेड येथे काल ( ता.. १९ ) अतिवृष्टी होऊन शेत पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे तर अनेक घरांमध्ये पाणी शिरून घराची ही पडझड झाली आहे. तेव्हा याचे पंचनामे प्रशासनाने करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दापशेडचे सरपंच विरभद्र राजूरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

येथे क्लिक करा कोरोनाचे सावट : अधिक मासात जावई मुकणार धोंड्याला -

उभ्या पिकांचे नुकसान झाले

 पुढे निवेदनात सरपंच विरभद्र राजुरे यांनी असे नमूद केले की, दापशेड येथे गेल्या पाच ते सात दिवसापासून परतीचा पाऊस प्रचंड प्रमाणे वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पडत आहे यामुळे शेतकऱ्याचे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बाधित गावांतील शेतामधील ज्वारी, कापूस सोयाबीन, आधी पिके आडवी झाली आहेत . त्यामुळे या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हा महसूल प्रशासनाने व कृषी विभागाने यांचे पंचनामे तात्काळ करावे. व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व घराची पडझड झालेल्या नागरिकांना त्याच्या घरात पाणी गेले आहे. त्याला नागरिकांना  नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी अशी मागणी राम पाटील  क्षीरसागर यांनी केली आहे. 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Loha taluka, farmers stranded in floods, released after two hours nanded news