esakal | नांदेडमधील दोन मंडळात अतिवृष्टी.....कुठे ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy rains in two circles.jpg

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत. या पावसामुळे जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. तसेच हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही ९५ टक्क्यावर पोहोचल्याने जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेपासून सुटका मिळाली आहे.

नांदेडमधील दोन मंडळात अतिवृष्टी.....कुठे ते वाचा

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी (ता. दोन) दुपारनंतर झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्याला चिंब केले आहे. रोहिणी नक्षत्रातील हा मान्सूनपूर्व पहिलाच मोठा पाऊस असल्याने शेतकरीही पेरणीपूर्व कामाला लागले आहेत. नांदेड तालुक्यातील लिंबगाव मंडळात ७३ तर हिमायतनगर तालुक्यातील सरसम मंडळात ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात बुधवारी (ता. तीन) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात एकूण ३००.६५ मिलिमीटर तर सरासरी १८.७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तापमानाचा पारा खालावला
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत. या पावसामुळे जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. तसेच हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही ९५ टक्क्यावर पोहोचल्याने जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेपासून सुटका मिळाली आहे. मंगळवारी (ता. दोन) दुपारनंतर जिल्ह्याच्या सर्वच भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. हा पाऊस नांदेड, भोकर, कंधार, हिमायतनगर, मुखेड, देगलूर या तालुक्यात अधिक झाला. तर इतर सर्वच तालुक्यात पावसाचे आगमन झाले. 

हेही वाचा....खते, बियाणे सुरक्षित पुरविण्याचा अवलंबला मार्ग

दोन मंडळात अतिवृष्टी
हा पाऊस नांदेड तालुक्यातील लिंबगाव मंडळात ७३ मिलिमीटर तर हिमायतनगर तालुक्यातील सरसम मंडळात ६६ मिलिमीटर नोंद झाल्यामुळे या दोन मंडळात अतिवृष्टीची नोंदणी झाली. मंगळवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रावरही बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा वेळेवर व चांगल्या पावसाचा पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकरीही सुखावले आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे.... नांदेडमध्ये दोन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ, रुग्णसंख्या गेली १५४ वर

मंडळनिहाय झालेला पाऊस 
(मिलीमीटरमध्ये)
नांदेड १९, तुप्पा १७, विष्णुपुरी २२, वसरणी १९, वजीराबाद २५, नांदेड ग्रामीण २३, तरोडा २४, लिंबगाव ७३, मुदखेड नऊ, मुगट १२, बारड २४, अर्धापूर १२, दाभड ११, मालेगाव २२, भोकर २८, किनी २६, मोघाळी १०, मातूळ ३६, उमरी सात, सिंधी व गोळेगाव प्रत्येकी दहा, कंधार ३१, कुरुळा १४, उस्माननगर १०, पेठवडज २४, फुलवळ ३५, बारुळ २२, लोहा २६, माळाकोळी सतरा, कलंबर १८, सोनखेड ११, शेवडी १५, कापशी २१, किनवट १६, इस्लापूर १४, मांडवी २३, बोधडी सात, दहेली १५, जलधारा सहा, शिवनी ११, माहूर १९, वानोळा १०, वाइ चार, शिंदखेड १२, हदगाव २१, तामसा १७, मनाठा २०, पिंपरखेड सतरा, निवघा सहा, तळणी १५, आष्टी २८, हिमायतनगर १३, सरसम ६६, जवळगाव २४, देगलूर ३९, खानापूर ४८, शहापूर ३५, मरखेल नऊ, हाणेगाव ३१, माळेगाव (म) १७, बिलोली नऊ, आदमपूर १९, कुंडलवाडी व सगरोळी प्रत्येकी सहा, धर्माबाद १६, जारीकोट नऊ, करखेली २४, नायगाव १४, नरसी १५, मांजरम २९, कुंटूर १३, मुखेड २८, जांब ३४, जाहूर १०,  चांडोळा १४, मुक्रामाबाद ३४, बाऱ्हाळी २०. 

तालुकानिहाय झालेला पाऊस

(मिलीमीटरमध्ये)
नांदेड २७.७५, मुदखेड व अर्धापूर प्रत्येकी १५, भोकर २५, उमरी नऊ, कंधार २२.६७, लोहा १८, किनवट १३.१४, माहूर ११.२५, हदगाव १७.७१, हिमायतनगर ३४.३३, देगलूर २९.९३, बिलोली ८.४०, धर्माबाद १६.३३, नायगाव १५ व मुखेड २२.१४. एकूण ३००.६५ मिलिमीटर तर सरासरी १८.७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाची वार्षीक टक्केवारी ५.५४ टक्के नोंदली आहे. 
 
 

loading image