esakal | जिल्ह्यात रविवारी सर्वाधिक २२९ अहवाल पॉझिटिव्ह, ११४ रुग्ण कोरोनामुक्त ः एका बाधिताचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

रविवारी (ता. सात) एक हजार ३६९ अहवाल प्राप्त झाले. यामधील एक हजार १०९ निगेटिव्ह, २२९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ५३८ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात रविवारी सर्वाधिक २२९ अहवाल पॉझिटिव्ह, ११४ रुग्ण कोरोनामुक्त ः एका बाधिताचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - या वर्षातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी दर्शवणारा रविवार दिवस ठरला आहे. रविवारी (ता. सात) प्राप्त झालेल्या अहवालात दिवसभरात २२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू तसेच ११४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यात आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींचे शनिवारी (ता. सहा) स्वॅब तपासणीकरीता घेण्यात आले होते. त्यापैकी रविवारी (ता. सात) एक हजार ३६९ अहवाल प्राप्त झाले. यामधील एक हजार १०९ निगेटिव्ह, २२९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ५३८ इतकी झाली आहे. किनवट तालुक्यातील आयप्पा स्वामी नगरातील महिला (वय ७८) यांच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ६०६ वर पोहचली आहे. 

हेही वाचा- बसस्थानकात येणाऱ्या एसटी बसेसना शिस्त लावणार कोण;पोलिस, सुरक्षा रक्षकांची बघ्यांची भूमिका

२३९ स्वॅबची तपासणी सुरु 

रविवारी नांदेड महापालिका क्षेत्रात - १५८, नांदेड ग्रामीण - तीन, देगलूर - दोन, लोहा- १९, मुदखेड -एक, नायगाव - एक, धर्माबाद - सहा, किनवट - आठ, उमरी - सहा, हिमायतनगर - एक, मुखेड - तीन, कंधार - पाच, अर्धापूर - नऊ, भोकर - एक, माहूर - एक, यवतमाळ - चार, हिंगोली - एक असे २२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २४ हजार ५३८ इतकी झाली असून, सध्या ८९९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी २२ जणांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत २३९ स्वॅबची तपासणी सुरु होती. 

हेही वाचा- नांदेड : राष्ट्रीय महामार्गसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळण्यास उशिर

नांदेड कोरोना मीटर  

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २४ हजार ५३८ 
एकूण कोरोनामुक्त रुग्ण - २२ हजार ८१८ 
एकूण मृत्यू - ६०६ 
रविवारी पॉझिटिव्ह - २२९ 
रविवारी कोरोनामुक्त - १२९ 
रविवारी मृत्यू - एक 
उपचार सुरु - ८९९ 
गंभीर रुग्ण - २२ 
स्वॅब प्रलंबित - २३९ 
 

loading image