तरुणीच्या धाडसाने वृद्ध दांपत्य बालंबाल बचावले

प्रताप देशमुख
Friday, 18 September 2020

मारोतराव जयवंतराव लोमटे हे वृद्ध आपल्या पत्नी सोबत छोट्याशा घरात राहतात. लोमटे यांना अपत्य नसून निराधारांच्या मानधनावर स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. या गावात श्रीमंत लोक राहत असले तरी अठरापगड जमातीच्या गरीब लोकांची संख्याही तेवढीच आहे. पक्की घरे असली तरी कसे घरेही पहावयास मिळतात. निराधार कुटुंबांच्या बाजूला असलेल्या घराची भिंत खिळखिळ झाल्याने अतिवृष्टीच्या पावसात कोसळली असून याचा फटका निराधारांच्या कुटुंबाला बसला आहे. 
 
बारड, (ता. मुदखेड) ः बारड (ता. मुदखेड) येथे मुसळधार पावसाने उंच भिंत कोसळून निराधार कुटुंबीयांचे दगड मातीचे घर भुईसपाट झाले असून पंधरा वर्षीय चिमुकलीच्या धाडसाने निराधार कुटुंबाचा जीव वाचला आहे. निराधारांची कोविलवाणी अवस्था पाहून शेजाऱ्यांना मायेचा पाझर सुटला असून या कुटुंबीयांना आधार दिला आहे. 

घराची भिंत खिळखिळ 
मारोतराव जयवंतराव लोमटे हे वृद्ध आपल्या पत्नी सोबत छोट्याशा घरात राहतात. लोमटे यांना अपत्य नसून निराधारांच्या मानधनावर स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. या गावात श्रीमंत लोक राहत असले तरी अठरापगड जमातीच्या गरीब लोकांची संख्याही तेवढीच आहे. पक्की घरे असली तरी कसे घरेही पहावयास मिळतात. निराधार कुटुंबांच्या बाजूला असलेल्या घराची भिंत खिळखिळ झाल्याने अतिवृष्टीच्या पावसात कोसळली असून याचा फटका निराधारांच्या कुटुंबाला बसला आहे. 

हेही वाचा -  दूर्दैवी घटना : बैलगाडीसह सालगडी वाहून गेला, सुदैवाने तो वाचला मात्र...

माणुसकीचे दर्शन घडविले 
निराधार कुटुंबांच्या पत्राच्या घरावर भिंत कोसळल्याने ऐंशी वर्षाचे दाम्पत्य मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. तेवढ्यात शेजारच्या दिव्या बाबुराव लोमटे या पंधरा वर्षीय मुलीने धाडस दाखवत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मूलबाळ नसलेल्या वयोवृद्ध दाम्पत्यांना बाहेर काढून जीव वाचविला आहे. परंतु निराधार बेघर कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी फिरकला नसून साधी माणुसकीही दाखवली नसल्याने प्रसिद्धीच्या झोतात फिरणाऱ्या पदाधिकाऱ्यांना लाजवेल अशी घटना म्हणावी लागेल. निराधार कुटुंबाला वास्तव्यासाठी कोणताच पर्याय नसल्याने शेजाऱ्याने निराधार कुटुंबाला स्वतःच्या घरात आश्रय देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. या निराधार कुटुंबियाच्या मदतीसाठी शासन तसेच सेवभवी संस्था जातीने लक्ष घालून आधार देण्याची गरज आहे. अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांतून उपस्थित होत आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The House Of The Old Homeless Collapsed, Nanded News