ई-पीक नोंदणी प्रक्रियेत अडचणी, शेतकऱ्यांकडे नाहीत अॅंड्राॅइड मोबाईल

ई-पीक नोंदणी
ई-पीक नोंदणीCanva

नांदेड : राज्य शासनाने शेतातील पिक पेरा नोंदवण्यासाठी ई-पीक पाहणी अॅप (e-Pik Pahani App) विकसित केले आहे. शेतकऱ्यांनी (Farmer) आपल्या अॅंड्राइड मोबाईल फोनवर सदर अॅप डाऊनलोड करून त्यावर प्रत्यक्ष फोटो अपलोड करून नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. पण अनेक शेतकऱ्यांकडे अॅंड्राइड मोबाईल नाहीत. त्यामुळे पूर्वीची पद्धत बरी आहे असा सूर शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. प्रत्येक गावांमधील लागवडी योग्य क्षेत्रावर कोणती पिके किती लावलेली आहे, याची माहिती शासनाला हवी असते. त्यातून राज्यात कोणते पीक किती आहे याची माहिती मिळेल तसेच नाफेडला (Nanded) शेतमालाची विक्री करताना किंवा एखाद्या पिकावर नैसर्गिक संकट आल्यास त्याला शासकीय लाभ देताना या पीक नोंदणीचा उपयोग होतो.

ई-पीक नोंदणी
दसऱ्याला भगवानगडावर मी येणार, तुम्हीही या; पंकजा मुंडेंची साद

आतापर्यंत सात बारावर ही नोंदणी तलाठी करत असत. आता हे अॅप आल्याने तलाठ्यांचा ताण कमी झाला. पण पीक नोंदणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. जिल्ह्यात अनेक शेतकरी अल्प, अत्यल्प भूधारक आहेत. यांच्यामधील बहुतेकांना अॅंड्राइड मोबाईल नाहीत. ज्यांच्याकडे व्यवस्था आहे, त्यांना मिश्र पिकांची माहिती कशी भरावी हे समजत नाही. जमीन क्षेत्रातील कायम पडिक क्षेत्र, शेतातील, बांधावरील झाडांची नोंदणी करताना देखील अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. सर्व माहिती भरल्यावर माहिती व फोटो अपलोड होत नाहीत. अशा एक नव्हे अनेक अडचणी आहेत. यापेक्षा पीक पेरा नोंदणी पूर्वीप्रमाणे तलाठ्यांकडून करून घ्यावी,असा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

ई-पीक नोंदणी
नांदेडमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी बस चिखलात रुतली

मोबाइल, नेटवर्कचा प्रश्न
शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक चणचण असते. जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात. त्यात महागडा मोबाईल फोन घ्यायचा कसा, घेतला तर त्याचे ४०० ते ५०० रुपयाचे रिचार्ज कसे करावे, हे जरी शक्य झाले तरी अनेकांच्या शेतात नेटवर्क नसते मग फोटो अपलोड कसे करावे, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.

माझ्याकडे साधा फोन आहे. फोन आला की एक बटण दाबायचे आणि बोलायचे. अॅंड्रॉइड मोबाईल फोन घ्यायचा कशाने आणि त्याचा रिचार्जचा खर्च देखील परवडत नाही. प्रचलित पद्धतीने पीक नोंदणी करावी.
- सिद्धार्थ पावडे, शेतकरी, वाडी

ई-पीक नोंदणी
Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकरी धास्तावला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com