काजव्यांच्या प्रकाशात पाहिलं सुगरणीचं घरटं...!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

नरानी उभारलेल्या आकर्षक घरट्यांवर मादी ही घरटे बघुनच आकर्षित होत असते. त्या घरट्याची शेवटची वीण हे दोघेही घट्ट करतात. तलावांच्या, विहिरीच्या  काठावर अतिशय अवघड ठिकाणी झुडपांत किंवा लव्हाळ्यांच्या बेटांत घरटी तयार करुन राहतात. सुगरण या पक्षाचे धान्य आणि किडे यांचे भक्ष्य आहे.

नांदेड : सुगरण पक्ष्यांबाबत पक्षीमित्र संशोधकांनी अनेक अभ्यासपूर्ण निरीक्षणे नोंदवलेली आहेत. मी अनेक वर्षापासून छायाचित्रकार म्हणून सुगरण पक्ष्यांचे वास्तव्य या विषयावर सर्व संकेत पाळून छायाचित्रण करीत असताना माझ्या निदर्शनात आले की, ज्ञात माहितीनुसार नर पक्षी हा मादिला आकर्षित करण्यासाठी सुंदर घरट्यांची उभारणी करतात.

आकर्षक घरट्यांवर मादी होते आकर्षित
नरानी उभारलेल्या आकर्षक घरट्यांवर मादी ही घरटे बघुनच आकर्षित होत असते. त्या घरट्याची शेवटची वीण हे दोघेही घट्ट करतात. तलावांच्या, विहिरीच्या  काठावर अतिशय अवघड ठिकाणी झुडपांत किंवा लव्हाळ्यांच्या बेटांत घरटी तयार करुन राहतात. सुगरण या पक्षाचे धान्य आणि किडे यांचे भक्ष्य आहे. त्यांचा आवाज हा  चिमणीसारखाच चिव-चिव असा असतो.

हेही वाचा....मनरेगाची तांत्रीक जबाबदारी पदवीधर ग्रामसेवकांवर सोपवावी......कोण म्हणाले ते वाचा

वेगवेगळ्या प्रकारचे निरीक्षणे
कित्येकदा उंच वृक्षांवर पानांच्या टोकाशी घरटे असतात. त्यांचे घरटे हे पालथ्या चंबूसारखे असून गवत, केळी व काथ्या इत्यादींच्या धाग्यांनी विणून तयार केलेले असतात.
छायाचित्रण करताना अरण्यॠषी मारुती चितम्मपल्ली यांच्या सहवासात निरीक्षण कसे करायला पाहीजेत, नोंदी कशा ठेवाव्यात, पक्ष्यांचा आधिवास राहण्याचे ठिकाण मग ते वृक्ष, वृक्षांच्या ढोली, घरटे आणि घरट्यांचे प्रकार माहीत झाले की, त्याठिकाणी वेगवेगळ्या वेळी जाऊन त्यांच्या जीवनविषयक वेगवेगळ्या प्रकारचे निरीक्षणे नोंदविणे सोपे जाते. 

हेही वाचलेच पाहिजे....सात टॅंकरने पाणी पुरवठा सूरु....कुठे ते वाचा

सोशल डिस्टन्स पाळणे चित्तमपल्लींकडून शिकाव
जसे जीवनाचे सातत्य टिकवण्यासाठी घरटी आवश्यक असतात, त्याचप्रमाणे आपल्या जिज्ञासू वृत्तीला ईथे आवरही घालावा लागतो. हेही शिकायला मिळाले, कारण घरट्यातील पक्षांना अजिबात उपद्रव होता कामा नये. हे सर्व नियम पाळतांना सुरक्षित अंतर ठेवणे सोशल डिस्टन्स पाळणे चित्तमपल्ली यांच्याकडून शिकायला मिळाले. आपला तर पिंड हा मूळचा छायाचित्रकाराचाच असल्याने जिद्द, सचोटी आणि सातत्य टिकवून सुरक्षित अंतर ठेवून  छायाचित्र टिपतांना मुळ स्वरुपात बारकाईने निरीक्षण करणे, नोंदी घेणे, हे पाहीजे तसे कधीही नेमकंपणानं जमलं नाही. परंतु, त्या-त्या वेळी एकाग्रपणे केलेल्या छायाचित्रणातून मात्र मन मस्तिष्काकावर ज्या नोंदी उमटल्या गेल्या त्या आता या लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या म्हणजेच कोव्हीडी-१९ या संसर्गाचा वैश्विक संकटाचा सामना  करणाऱ्यांनी आपलं जीवन निसर्ग पशु-पक्षी पर्यावरणाच्या सानिध्यात केलेल्या आजवरच्या विविध प्रसंगीच्या आठवणी ठेवण्याचा मोह आवरत नाही. 

मादीला आकर्षित करण्यासाठी घरट्याची सजावट
आपल्यासह सर्वांनाही लॉकडाउनचा काळही सुसह्य व्हावा यासाठी या काळात संग्रहीत छायाचित्रणातून साठवून ठेवलेले अनुभव माडंताना सुगरण पक्ष्याबाबत असेही दिसून आले की, ते विहिरींच्या काठावर बांधण्यात आलेल्या घरट्यात नर हा पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी  घरट्यात रंगीत खडे, पाने-फुले नेवून टाकून जणूकांही घरटी सजवतात की, काय तर एका विहिरींच्या काठावर  उभारलेल्या घरट्यात रात्रीच्या वेळी घरट्यातून काजवे मिन-मीनताना दिसून आले, हे दृष्य पाहुन कॅमेरा बाजूला  ठेवला आणि पाहतच राहिलो, थोडा विचार केला की काजवे आत शिरले का किंवा नर पक्षांनी घरट्यामध्ये का नेवून ठेवले. 

दिर्घ संशोधनाचा विषय
बराच वेळ पुन्हा तोच तो विचार करत तिथेच घुटमळत राहिलो, आणि लक्षात आलं की, हा विषय आपल्या आवाक्या बाहेरचा हा दिर्घ संशोधनाचा विषय आहे. या विषयी अनुभवलेली माहिती तज्ज्ञसंशोधक अभ्यासकांसमोर, निसर्ग प्रेमी पक्षीमित्रांसमोर ठेवावी. पाहिलेला अनुभव सांगावा आणि याची उकल होताच पुन्हा अत्याधुनिक डिजिटल लोलाईट हायस्पीड कॅमेरातून अनुभवलेली ही दृष्य पुन्हा टिपून कशी आपल्यासमोर  सादर करता येतील याच शोधात...!
 
- विजय होकर्णे
पक्षीमित्र छायाचित्रकार, नांदेड.
9422162022/8668874799.
vvhokarne@gmail.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I saw the sugarcane nest in the light of fireflies ...!