
अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला धम्मध्वजारोहन व धम्मदेशनेने सुरुवात
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील लहान- लोणच्या तपोवन बुद्धभूमीत दोन दिवशीय चालणा-या धम्मपरिषदेला सोमवारी (ता. आठ) धम्मध्वजारोहन करुन सुरुवात झाली. या धम्म परिषदेचे उद्घाटन महाउपासक डाॅ एस. पी. गायकवाड यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले.
ही धम्म परिषद पूज्य भदंत सत्यानंद महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवस चालणार आहे. आठराव्या धम्म परिषदेला मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. यावेळी पूज्य भदंत पय्यारत्न ( नांदेड ), पूज्य भदंत कमलबोधी ( पुसद ), पूज्य भदंत शीलरत्न, पूज्य भदंत सुबोती यांच्यासह भिक्खु संघाची धम्मदेशना झाली. धम्मध्वजारोहण लहान येथील ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत भिक्खू संघाच्या हस्ते संपन्न झाला.
भिक्खूसंघाने धम्मदेसना देताना पंचशीलाचे पालन केले तर मानव दुःखमुक्त होईल. अष्टशीलाचे पालन केले पाहिजे. विज्ञानवादी धम्म स्विकारला तर देशावर कसलेही संकट येणार नाही असे प्रतिपादन केले. या दोन दिवशीय धम्म परिषदेत मंगळवारी (ता. नऊ) सकाळी ११ वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत धम्मदेसना होणार आहे. या धम्म परिषदेला चाभरा, चेनापुर, लहान- लोण यासह परिसरातील उपासक- उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अर्धापूर पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक श्री. राठोड व किशोर पाटील उपस्थित होते. या धम्म परिषदेचे प्रास्ताविक संजय लोने यांनी केले तर सूत्रसंचालन शामराव लोणे यांनी केले.
संपादन- प्रल्हाद कांबळे