वैभवाची साक्ष देणारे वाडे दुर्लक्षित

गाव खेड्यात काहींनी जपला वारसा : काही नोकरीसाठी शहराकडे वळले
Ignoring historical glory Old castles built of white clay and stone nanded
Ignoring historical glory Old castles built of white clay and stone nandedsakal

नांदेड : सुमारे शंभर दोनशे वर्षांपूर्वी प्रत्येक गाव खेड्यात वैभवाची साक्ष असलेले पाटील, देशमुख, महाजन, नाईक आदींचे वाडे होते. मात्र, वैभवाची साक्ष देणारे हे वाडे आज पूर्णतः दुर्लक्षित झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी मात्र काहींनी हा वारसा जपला आहे तर काही नोकरीच्या निमित्ताने शहराकडे वळले आहेत.

पूर्वी प्रत्येक गावात पाटील, देशमुखाचा वाडा असायचा. दोन मजले असलेले दगड माती यांच्या भिंती, बांधकामात सागवानी लागडाचा वापर, घराच्या आत लाकडावर नक्षीकाम, वाड्यासमोरच मोठी प्रशस्त जागा, रांधणी आणि पडवी असे विविध भागात साधारण पन्नास माणसे बसतील एवढी बैठक, लाकडी पाळणा, मुख्य दरवाजासमोर वाड्याला चारही बाजूला छोटे दरवाजे असेच वाड्याचे चित्र असायचे. अनेक वाड्यात धान्य साठवण्यासाठी आवारात जमिनीत दहा ते वीस फूट खोल खड्डा खोदून पेव तयार केलेले असायचे. याच परिसरात पाण्याची विहीर, जवळच गुरांचा गोठा, त्या काळात या गोठ्यात चार-आठ बैल जोड्या असायच्या. तसेच बैलगाडी, वखर, नांगर असे शेती मशागतीचे विविध साहित्य असायचे.

परंतु, आज काळाच्या ओघात आता अनेक वाडे उदध्वस्त झाले आहेत. पाटील, देशमुखांची पुढची पिढी नोकरी करण्यासाठी शहराकडे वळली. त्यातील बरेच जण शहरात स्थायीक झालेत. त्यामुळे साहजिकच त्या वाड्याकडे दुर्लक्ष होत गेले. आज गावखेड्यातील हे वाडे पडून त्याजागी मोकळे मैदान राहिले तर काही गावा वाड्याचे काही अवशेष शिल्लक असल्याचे बघायला मिळत आहे.

जिल्ह्यात अनेक गावात वाडे होते. काही वाड्यांची योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती करून सुव्यवस्थित केल्याचे दिसून येते. तिथे पाटील जमीनदार यांच्या वंशजांनी जुना वारसा जपून ठेवल्याचे दिसून येते. अनेक कुटुंब आजही त्या वाड्यात वास्तव्य करीत असल्याचे बघायला मिळत आहे. परंतु, काही ठिकाणी या वाड्यांचे मोठ्या इमारतीमध्ये रुपांतर झाले आहे.

देखभाल झाली खर्चिक

जुन्या काळातील वाडे पांढऱ्या मातीत व तासीव दगडात बांधलेले आहेत. गावखेड्यातून बारा बलुतेदार परागंदा झाल्याने या वाड्याच्या दुरुस्तीसाठी पाथरवट, बेलदार, सुतार या कारागिरांची उपलब्धता नाही तसेच या वाड्यांची देखभाल खर्चिक असल्याने वाड्यातील माणसे वाड्याबाहेर पडली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com