रुग्ण वाढल्याने तपासणीसह कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष...कुठे ते वाचा

शिवचरण वावळे
Friday, 28 August 2020

ना सॅनिटायझर, ना तपासणी, तरीही गर्दी कायम
नांदेड जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने मार्च - एप्रिलपासून लॉकडाउनची घोषणा झाली अन् अत्यावश्‍यक सेवा सुविधा वगळता अनेक व्यवहार, उद्योग आणि व्यवसायावर मर्यादा घालण्यात आली. काही दिवसापासून बाजारपेठ, उद्योग, व्यवसाय सुरु करण्यात आली. त्यामुळे गर्दी वाढली अन काळजी घेणे बंद झाले. शहरातील मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलची देखिल हिच अवस्था आहे.

नांदेड -  लॉकडाउन दरम्यान, कोविड योद्धा म्हणून रुग्णसेवा देणारे अनेक डॉक्टर पूर्वी दिवसभरात वीसपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करत नव्हते. खबरदारी म्हणून तपासणीला येण्यापूर्वी रुग्णांना फोन करुन नोंद करावी लागत असे. तेव्हा पहिल्या वीस रुग्णांनाच डॉक्टरची वेळ मिळत होती. परंतू, सध्याची बदललेली परिस्थिती पाहता डॉक्टरांना कामाचा ताण आणि रुग्णसंख्या याचे गणित लावण्यास वेळच नाही. असे असताना काही प्रणाणात रुग्ण तपासणीसह नियमांकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच आहे.   

सहा महिण्यापूर्वीची परिस्थिती बघता एखादी व्यक्ती गंभीर आजारी असली तरी, उपचारापूर्वी त्यास शासकीय रुग्णालयात जाऊन कोविड- १९ चाचणी करणे बंधनकारक होते. मात्र अनेकांनी कोरोनाची धास्ती घेतल्याने त्यांना कोरोना चाचणी नको वाटत होती. म्हणून घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना कोरोनाच्या आजाराची लागणार नाही याची काळजी घेतली जात होती. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, सुस्तपणा या सारख्या आजार अनेकांनी अक्षरशः दुखणे अंगावर काढले होते. त्यामुळे नांदेड शहरातील मल्टी सुपर स्पेशालीटी हॉस्पीटलमध्ये रुग्णांचा शुकशुकाट होता. 

हेही वाचा- नीट व जेईईच्या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी- पालकमंत्री अशोक चव्हाण ​

रुग्णांकडून जास्तीचे पैसे उकळल्याच्या तक्रारीत वाढ

कोरोनाच्या भीतीने रुग्णालयात पूर्वीप्रमाणे रुग्ण येत नसल्याने व शासकीय रुग्णालयात कोरोनाग्रस्तांना उच्च दर्जाच्या उपचारसुविधा मिळत नसल्याने कोरोनाग्रस्तांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरु करण्यात येत आहेत. ही रुग्णालये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरु करण्यात येत असली तरी, रुग्णांकडून जास्तीचे पैसे उकळल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे येत आहेत. 

कोरोना चाचणीचा अहवाल आल्याशिवाय त्या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार न करणारे कोरोनाची भितीच नव्हे तर, नियमांना देखील पायदळी तुडवताना दिसून येत आहेत. लॉकडाउन शिथिल झाल्यापासून रुग्ण वाढल्याने शहरातील अनेक मोठ्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण किंवा त्यांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांची ना थर्मल गनद्वारे तापीची तपासणी, ना हातावर सॅनिटायझर ही दिले जाते. तरीही रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी वाढली इतका निष्काळजीपणा केला जात आहे. 

हेही वाचा- चौदा वर्षानंतर जिल्ह्यातून चिकनगुनिया हद्दपार! आरोग्य यंत्रणेचा अहवाल; रुग्णांचे प्रमाण झाले कमी

रुग्ण व नातेवाईकांची काळजी घेणे रुग्णालय प्रशासनाचे कर्तव्य

डॉक्टर हा देव नसला तरी, देवापेक्षा कमी नाही. असा रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात विश्‍वासाचे घट्ट नाते आहे. परंतू, याच विश्‍वासावर रुग्णालयाच्या दारात आलेल्या अत्यावश्‍यक रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची काळजी घेणे व रुग्णालयात आलेल्या रुग्णांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी सॅनिटायझर, तापीची तपासणी करणे हे देखील रुग्णालयाचे आद्य कर्तव्य आहे. मात्र तसे कुठेच होताना दिसत नाही. त्यामुळे डॉक्टर कोरोनाला व शासनाच्या आदेशाला घाबरत नाहीत असेच दिसून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ignoring The Rules Of Corona With Examination As The Patient Grows Read It Where Nanded News