Video : मुलाखतीला जाण्यापूर्वी मनाची तयारी आवश्‍यक - डॉ. हनुमंत भोपाळे

File photo
File photo

नांदेड : मुलाखतीचा टप्पा यशस्वीपणे पार करणे म्हणजे मनाला नवी उभारी मिळालेली असते. फक्त दोन पावलांवर यश आपली वाट पाहत असते. मुलाखतीची ही दोन पाऊले अत्यंत महत्त्वाची असतात. म्हणूनच अनेकांच्या मनावर मुलाखतीचा अतिरिक्त ताण आलेला असतो. हा ताण यशस्वीपणे हाताळणे हेच महत्त्वाचे कौशल्य आहे. त्यासाठी मानसिक तयारी करावी लागते.

कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्टता गाठण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असतेच त्याचबरोबर योग्य सल्लाही महत्त्वाचा असतो. आजकाल आपण पाहतो सल्ला केंद्राचे दुकाने जोरात चालू आहेत. त्याविषयीचे अनेक कोर्सेस, समुपदेशन केंद्र यांचे अमाप पीक आले आहे. यातून उत्तम शोधून त्याचा आधार घेणे कठीण बनले आहे.  कोणत्याही क्षेत्रातही उज्वल करिअरसाठी संवाद कौशल्याची गरज असते. त्यासाठी कोणत्या व्यक्तीबरोबर संवाद साधायचा आहे, संवादाची भाषा, संवादाचे माध्यम यासारख्या दहा प्रमुख गोष्टींची आवश्‍यकता असते. सभा किंबा मीटिंगचे इतिवृत्ताची आवश्‍यकता. याद्वारे पुढील मीटिंग किंवा बैठकीत मागील गोष्टींचा आढावा घेता येतो. 

दूरध्वनीवर बोलण्यासाठी खास संवाद कौशल्य असावे लागते. दूरध्वनीवर बोलताना समोरची व्यक्ती कोण आहे याचा घेऊन त्याच्या प्रश्‍नांना सकारात्मक उत्तर देणे आवश्‍यक असते. यादरम्यान आवाजाची योग्य पातळी राखणे गरजेचे असते. दूरध्वनीवर बोलत असताना समोर बसलेल्या व्यक्तींशी देहबोलीद्वारे कसा संवाद साधण्याचे कौशल्य अंगीकारावे. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या प्रसंगांना सामोरं जाण्यासाठीचे किमान कौशल्याची आवश्‍यकता असावी लागते. 
 
कॅम्पस इंटरव्ह्यू देताना घ्यावयाची काळजी...
तणावमुक्त व शांत अवस्थेत कंपनी प्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करवा. मुलाखतीपूर्वी आपला बायोडाटा एकदा नीट पुन्हा वाचून घ्यावा. बऱ्याचदा आपण लिहिलेल्या मजकुरातून संवादाची सुरवात होते. त्यामुळे आपण तो वाचल्याने आपल्याला चांगली सुरवात करता येते. मुलाखतीस जाताना महाविद्यालयाचा गणवेश अवश्‍य घालावा. तो स्वच्छ व व्यवस्थित असावा. मुलाखतीच्या रूममध्ये प्रवेश करताना आत्मविश्‍वास आणि मोकळ्या मनाने प्रवेश करावा. आपली देहबोली चांगली ठेवावी. मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्‍नाची अचूक मोजक्‍या शब्दांत उत्तरे द्यावीत. 

हे देखील वाचाच - मराठवाड्यातून भोपाळला मजूरांसाठी रेल्वे, मुंबईसह पुण्यात अडकलेल्यांचे काय ?
 
आपल्या सॉफ्ट स्किल्सवर भर द्या!
महाविद्यालयाकडून प्लेसमेंट सेल्सअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किल्स विकासाकरिता विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कक्षा अधिक रुंदावतात व मोठा वाव मिळतो. सॉफ्ट स्किलचा सरळ अर्थ आहे, की ताणतणावाच्या परिस्थितीतही धैर्याने काम करणे. नेतृत्वगुण, संवादकौशल्य, कॅपेबिलिटी, हसत काम करणे किंवा करून घेणे, मनमिळाऊ स्वभाव याला सॉफ्ट स्किल्स म्हणतात. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत सहभाग घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com