Loksabha Election 2024 : कायदा-सुव्यवस्था, समन्वयावर नांदेडमध्ये मंथन ; वेध निवडणुकीचे,सीमेलगतच्या जिल्ह्यांतील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक

नांदेडसह महाराष्ट्र, तेलंगण- कर्नाटक सीमेलगत असलेल्या निजामाबाद, बिदर, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद येथील पोलिस प्रमुखांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. पाच) येथील नियोजन भवनात आढावा बैठक झाली. आगामी निवडणुका आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली.
nanded
nandedsakal

नांदेड : नांदेडसह महाराष्ट्र, तेलंगण- कर्नाटक सीमेलगत असलेल्या निजामाबाद, बिदर, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद येथील पोलिस प्रमुखांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. पाच) येथील नियोजन भवनात आढावा बैठक झाली. आगामी निवडणुका आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली.

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निजामाबादचे पोलिस आयुक्त कमलेश्वर शिंगेनावर, नांदेडचे पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निर्मलच्या अधिक्षक श्रीमती डॉ. जी. जानकी शर्मिला, कामारेड्डीचे अधिक्षक सिंधू शर्मा, बिदरचे अधिक्षक एस. एल. चेन्ना बसवन्ना, आदिलाबादचे अधिक्षक गौस आलम, नांदेडचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, भोकरचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शेजारच्या तेलंगण व कर्नाटक राज्यातील निजामाबाद, बिदर, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद आदी जिल्ह्यांतील प्रशासन व पोलिस विभागाशी परस्पर समन्वय महत्त्वाचा आहे. शेजारच्या जिल्ह्यांच्या सीमांवर विशेष पोलिस चौक्या तयार करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना पोलिस यंत्रणेला दिल्याचे महावरकर यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या तेलंगणच्या निवडणुकीत शेजारील जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून एक चांगला अनुभव आपण घेतला आहे. तो गृहीत धरून पुढील निवडणुका अधिक चांगल्या, भयमुक्त वातावरणात पार पडतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला.

nanded
Loksabha Election 2024 : 'माझ्या विचाराच्या उमेदवाराला...' अजित पवारांनी बारामतीत फुंकले लोकसभेच्या निवडणूकीचे रणशिंग

निर्मल, आदिलाबाद, बिदर, कामारेड्डी या जिल्ह्यांच्या पोलिस अधिक्षकांनी सीमावर्ती गावांतून गुटखा, इतर बंदी असलेल्या पदार्थांची छुपी होणारी वाहतूक, निवडणूक काळात घ्यावयाची काळजी याबाबत चर्चा केली. जिल्हा पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. अबिनाश कुमार यांनी सादरीकरणाद्वारे नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांचा आलेख सादर करून माहिती दिली.

आदर्श आचारसंहितेत निर्भयतेने मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक मतदाराला मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडण्यासाठी भयमुक्त वातावरण सहाय्यभूत ठरते. निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया आदर्श आचारसंहितेप्रमाणे पार पाडाव्यात यासाठी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याची जबाबदारी प्रशासन व पोलिस विभागावर आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यासह शेजारील तेलंगण, कर्नाटकातील निर्मल, आदिलाबाद, कामारेड्डी, बिदर, निजामाबाद आदी जिल्ह्यांतील पोलिस विभागांचा परस्पर समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे.

- शशिकांत महावरकर, विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com