कोरोना लढ्यात भारताची चांगली कामगिरी- डॉ. हर्षवर्धन

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 26 August 2020

यामध्ये वेबसंदावमध्ये लातूरच्या विवेकानंद हॉस्पिटलचे संस्थापक पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. अजित गोपछडे हे सहभागी झाले होते.

नांदेड : सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या लढ्यात अन्य देशाच्या तुलनेत भारताने सरस कामगिरी केली आहे. असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले. ते भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर्स आघाडीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मंगळवारी (ता. २५) वेब संवाद साधताना बोलत होते.

यामध्ये वेबसंदावमध्ये लातूरच्या विवेकानंद हॉस्पिटलचे संस्थापक पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. अजित गोपछडे हे सहभागी झाले होते. डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, भाजप वैद्यकीय आघाडीसोबत आपले जुने संबंध आहेत. गेल्या वीस वर्षापासून आपण वैद्यकीय आघाडीशी जोडले गेलो आहोत. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अभूतपूर्व आरोग्य क्षमता विकसित केली आहे. वैद्यकीय साधनांच्या बाबतीतही भारताची स्थिती मजबूत आहे. कोरोनाशी लढा देण्यात आणि अन्य देशांच्या तुलनेत भारताने सरस कामगिरी केली आहे असे ते म्हणाले.

हेही वाचा  नांदेड जिल्ह्यात भोसी येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरु करणार-  पालकमंत्री अशोक चव्हाण

वैद्यकीय आघाडीने चांगले काम केले 

राज्यात डॉ. दिलेले योगदान प्रशंसनीय आहे. त्याबद्दल त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांच्या आरोग्यासाठी प्रथम प्राधान्य दिले आहे. सरकार नागरिकांच्या आरोग्याबाबत चांगल्या उपाययोजना राबवित आहे. देशातील सर्व डॉक्टरांनी कोरोना युद्धात सहभागी व्हावे असे आवाहन केले. मातामृत्यू दर घटविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले. यावेळी डॉ. अशोक कुकडे यांनी राज्यात अंत्योदय व राष्ट्रसेवा याबाबतीत अनेक लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित केले जातात. वैद्यकीय आघाडीने चांगले काम केले आहे, असे सांगत डॉ. अजीत गोपछडे यांनी भाजपची वैद्यकीय आघाडी गेल्या सहा वर्षापासून राज्यात संघटन मजबूत करीत आहे.

कोरोना लढ्यात अनेक डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली

सात विभागात आघाडीने कार्यकारिणी जाहीर केली असून या आघाडीचे साडेतीन हजार पदाधिकारी डॉक्टर, पॅरामेडिकल, फार्मासिस्ट, डेंटिस्ट आदींच्या संघटना या लढ्यात सहभागी आहेत. आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक होते. त्यामध्ये रचनात्मक कार्याबाबत चर्चा करून त्याची अंमलबजावणी केली जाते. कोरोना लढ्यात अनेक डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली तरी ते मोठ्या जीद्दीने रुग्णालयात कार्यरत आहेत. असे सांगून त्यांनी डॉक्टर, पॅरामेडिकल आदींच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी डॉ. अशोक कुकडे, डॉ. अजित गोपछडे, डॉ. मेघनाथ चौगुले, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. स्वप्नील मंत्री, डॉ. स्मिता काळे यांनी सहभाग घेतला होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India's good performance in Corona fight Dr. Harshavardhana nanded news