लिपिकाची मुलगी बनली शिक्षणाधिकारी : जिल्ह्यातील मंजुश्री, शालिनी, शीतल यांनी स्पर्धा परीक्षेत घेतली भरारी

मालेगाव रस्त्यावरील गणराज नगर येथील रहिवासी व ग्रामिण भागातील लिंबगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिक माधव कल्लेवाड यांची मुलगी मंजुश्री कल्लेवाड हिने २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धा परिक्षेत उत्तुंग यश मिळवत शिक्षणाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.
 Manjushir Kallevad
Manjushir Kallevadsakal

inspering story of manjushir kallevad Become Education Officer

Nanded News : मालेगाव रस्त्यावरील गणराज नगर येथील रहिवासी व ग्रामिण भागातील लिंबगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिक माधव कल्लेवाड यांची मुलगी मंजुश्री कल्लेवाड हिने २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धा परिक्षेत उत्तुंग यश मिळवत शिक्षणाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

ग्रामिण भागातील तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांतील मंजुश्री कल्लेवाड हिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.मंजुश्री मधुरा माधव कल्लेवाड हिचे प्राथमिक शिक्षण तरोडा भागातील छत्रपती चौक येथे असलेल्या के. एम. पाटील शाळेत झाले आहे.

त्यानंतर तिने माध्यमिक शिक्षण कमला नेहरू विद्यालयात तर अकरावी, बारावीचे शिक्षण नवीन नांदेड भागातील सिडकोच्या शिवाजी विद्यालयात घेतले आहे. त्यानंतर बारावीत यश मिळवत पुणे येथील सीओईपी महाविद्यालयातून २०२१ मध्ये बीटेकची पदवी मिळवली. दरम्यानच्या काळात तिने स्पर्धा परिक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार नियोजन करून अभ्यास सुरू केला.

कोणतीही खासगी शिकवणी लावली नाही. पहिल्याच प्रयत्नात तिने परिक्षेत यश मिळवले असून तिची शिक्षणाधिकारीपदी निवड झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com