esakal | कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा वापर टाळा : महावितरणचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विच ऐवजी कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे,

कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा वापर टाळा : महावितरणचे आवाहन

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विच ऐवजी कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या नांदेड परिमंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.

कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे. कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे रोहित्रांवरील भार ३० टक्क्यांने कमी होऊन रोहित्र नादुरुस्तीचे व जळण्याचेही प्रमाणही कमी होते तसेच योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात. विद्युत केबल जळण्याचेही प्रमाण कमी होते. पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळल्यामुळे कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाबाचा, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळेल. या सर्वांचा लाभ शेतकर्‍यांना होणार असल्यामुळे त्यांनी ' कॅपॅसिटर'चा जास्तीत जास्त वापर करावा. प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे.

हेही वाचा -  कोरोनाचे सावट : अधिक मासात जावई मुकणार धोंड्याला -

कॅपॅसिटर बसवितांना ते आय एस आय मार्कचे व नामांकीत कंपनीचेच बसवून घ्यावेत

कॅपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी कृषिपंपास कॅपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली असल्याने ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद असल्यास किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत. कॅपॅसिटर बसवितांना ते आय एस आय मार्कचे व नामांकीत कंपनीचेच बसवून घ्यावेत. असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

ऑटोस्विचचा वापर टाळा

महावितरणकडून शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ’ऑटोस्विच’लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. त्यामुळे कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवून ऑटो स्विचचा वापर टाळावा, असे आवाहन महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

loading image
go to top