Nanded : आंबेडकर जयंती केली म्हणून दलित तरुणाची निर्घृण हत्या; अशोक चव्हाण म्हणाले, 'वातावरण खराब करू नका'

कोणीही या प्रकरणाला वेगळे वळण देऊन जिल्ह्यातील वातावरण खराब करू नये व शांतता कायम ठेवावी.
Akshay Bhalerao Murder Case Congress leader Ashok Chavan
Akshay Bhalerao Murder Case Congress leader Ashok Chavanesakal
Summary

कोणीही या प्रकरणाला वेगळे वळण देऊन जिल्ह्यातील वातावरण खराब करू नये व शांतता कायम ठेवावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले.

नांदेड : बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या युवकाची हत्या (Akshay Bhalerao Murder Case) निषेधार्ह आहे. पोलिसांनी दिरंगाई, हलगर्जी न करता या गंभीर प्रकरणाचा योग्यपणे सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा होईल, अशा पद्धतीने आरोपपत्र दाखल करावे.

दरम्यान, कोणीही या प्रकरणाला वेगळे वळण देऊन जिल्ह्यातील वातावरण खराब करू नये व शांतता कायम ठेवावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले आहे. ते म्हणाले की, दोन जून रोजी सकाळी या घटनेबाबत माहिती मिळताच मी संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडून घटनाक्रम व तपासाच्या प्रगतीची माहिती घेतली.

Akshay Bhalerao Murder Case Congress leader Ashok Chavan
Rishikant Shinde : राष्ट्रवादीत गद्दारी, पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळंच मी शिवसेनेत प्रवेश केला; शिंदेंच्या भावाची कबुली

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी सूचनाही केली. लोकशाही व संविधानानुसार चालणाऱ्या भारतात अशा घटना घडणे चुकीचे आहे. नांदेड जिल्ह्यात घडलेली ही घटना राज्य सरकारचे अपयश आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने जबाबदारी स्वीकारून हा तपास वेगाने पूर्ण करावा.

Akshay Bhalerao Murder Case Congress leader Ashok Chavan
Factory Election : शिवसेनेचे खासदार संजय मंडलिकांची बिनविरोध निवड; निवडणुकीतून 'इतक्या' उमेदवारांनी घेतली माघार

तसेच जिल्हा व इतरत्र सामाजिक सलोखा तसेच शांततेचा भंग होणार नाही, याकरिता आवश्यक ती पावले उचलावीत, अशी आमची मागणी आहे. कोणत्याही अफवांना किंवा अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com