शहराऐवजी खेड्यात वाढणार गुंतवणूक...? कशी ते वाचा...

file photo
file photo

नांदेड : संबंध जगाला वेठीस धरुन लाखोंचा बळी घेतलेल्या कोरोना या विषाणूने पूर्ण मानवजातीला आपल्या जागी आणुन ठेवले आहे. गर्भ श्रीमंत असो या हातावर पोट असलेला मजुर असो यांना कोरोनामुळे तेवढीच काळजी घ्यावी लागत आहे. ग्रामिण भागातील युवक मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीकडे वळला होता. त्यामुळे ग्रामिण भागात शेतीवर किंवा अन्य कामे करण्यासाठी मजुर भेटत नव्हता. शहरासोबतच ग्रामिण भागाचा विकास होणार असून आता ग्रामिण भागातही गुंतवणुक वाढणर असल्याचे चित्र दिसत आहे.

कोरोना या महाभंयकर आजाराने जगातील महासत्ताना हादरुन सोडले आहे. मागील तीन ते चार महिण्यात जवळपास पाच तीन लाखाहून अधिक बळी या कोरोनामुळे गेले आहेत. लाखोंना या आजाराची लागन झाली आहे. त्यामुळे संबंध जगातील व्यक्ती आज त्रस्त झाली आहे. घरातून बाहेर पडणे त्याला अवघड झाले आहे. या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. काही देशात तर लॉकडाउन सुरवातीला लावले नसल्याने बळींचा आकाडा वाढला आहे. त्या ठिकाणीही आता लॉकडाउन करण्यात आले आहे. 

प्रत्येकाला गाव गाठण्याची आस लागली आहे

भारत देशातही पाचवे लॉकडाउन जून शेवटपर्यंत असणार आहे. या लॉकडाउनचा फटका सर्वसाधारण कामगार, गरीब वर्ग आणि मध्यमवर्गीयांनाही बसला आहे. तीन महिण्यापासून उद्योग कारखाने बंद असल्याने त्यावर आधारीत असलेल्या लाखों कामगारांचा रोजगार गेला. शहरात राहणाऱ्या या कामगारांचे पुरते हाल सुरू झाले. हातची नोकरी गेली, त्यामुळे येणारे उत्पन्न घटले. घराचे भाडे व प्रपंच चालिवण्यासाठी त्यांना आता आपली मायभूमी म्हणजे गावाकडे धाव घ्यावी लागली. यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. अजूनही हजारो कामगार, खेड्याकडून शहरात गेलेले अडकून आहेत. त्यांनाही आपले गाव गाठण्याची आस लागली आहे. 

ग्रामिण भागातील गुंतवणूक वाढणार

शहराबरोबर ग्रामिण भागाचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर खेड्यातून शहराकडे वळलेल्या सर्व तरुण कामगारांनी पुन्हा खेड्याकडे वळा. तरच आपल्या देशाचा व खेड्यांचा विकास होईल असे नेहमी महात्मा गांधी बोलत असत. त्यांच्या या मार्मीक सादाला खऱ्या अर्थाने आज कोरोनासारखा महाआजाराला भिऊन शहरात स्थिरावलेला कामगार खेड्याकडे वळला आहे. आलेल्या कामगारांमुळे शहरातील उद्योग व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. कारखानादारांना आता कामगार शोधावे लागत आहेत. तर इकडे ग्रामिण भागातील गुंतवणूक वाढणार असल्याचे पुणे येथून आपल्या गावी आलेले प्रशांत जवळगावकर आणि किशन कांबळे यांनी बोलुन दाखविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com