
नांदेड जिल्हाध्यक्षपदी जगन गोणारकर यांची निवड करण्यात आली. यावेळी गोणारकर यांनी उपस्थिक कर्मचाऱ्यांना विश्वास दिला.
नांदेड ः भारत वानखेडे प्रणित अनुसुचित जाती जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई या संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी जगन गोणारकर यांची निवड करण्यात आली. यावेळी गोणारकर यांनी उपस्थिक कर्मचाऱ्यांना विश्वास दिला.
संघटनेचे राज्याध्यक्ष भारत वानखेडे याच्या अध्यक्षतेखाली व राज्य महासचिव डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांच्या उपस्थितीत हॉटेल ताज पाटील नांदेड येथे पार पडलेल्या विभागीय मेळाव्या प्रसंगी जगन गोणाकर यांना निवडीचे पत्र देवून कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मराठवाड्यातील, विदर्भातील विविध संघटनेतून भारत वानखेडे व डॉ. उत्तम सोनकांबळे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्ते व नेत्यांनी या संघटनेत प्रवेश केला आहे.
हेही वाचा - जागतिक मराठी भाषा दिन विशेष : जागतिकीकरणात मराठी भाषा
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रमुख पाहुण म्हणून डॉ. उत्तमराव सोनकांबळे, राज्य महासचिव राजेंद्र वाघमारे, राज्य संघटन सचिव संजय चुरमुले, विभागीय अध्यक्ष लातूर बालाजी बागल, जिल्हाध्यक्ष, लातूर अनिल गायकवाड, विभागीय अध्यक्ष, लातूर सुरेश अरगुलवार, जिल्हाध्यक्ष, आरोग्य विभाग, सुनिल वाघमारे, राज्य सचिव, आरोग्य, दिनानाथ जोंधळे, जिल्हा महिला सचिव सरुताई शिरोळे, अध्यक्ष, आदिवासी विभाग, राजरत्न पवार आदी उपस्थित होते.
निवडीबद्दल यांनी अभिनंदन केले
या निवडीबद्दल भारत वानखेडे, डॉ. उत्तम सोनकांबळे, जिवन कांबळे, डॉ. राजेंद्र गोणारकर, रोहिदास आव्हाड, डॉ. नंदन नांगरे, रामदास गोणारकर, मधुकर सदाशिव गच्चे, डॉ. पाळेकर, डॉ. मिलिंद पांडूर्णीकर, प्रा. अशोक कांबळे, डॉ. गंगाधर गोपाळकर, प्रा. सदानंद गोणारकर, विलास कांबळे, संजय वाघमारे, संतराम टोम्पे, एम. टी. वाघमारे यांनी अभिनंदन केले.