

Nanded
esakal
जिंतूर: कोमात असलेल्या भावाच्या उपचारासाठी पैसे घेऊन निघालेल्या तरुणाचा वाटेतच अपघाती मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रविवारी (ता. ३१) सकाळी ७.३०च्या सुमारास जिंतूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रायखेडा पाटीजवळ घडली. अनिल देविदास सुर्वे (वय २५, रा. दताड, ता. सेनगाव) असे मृताचे नाव आहे. अपघातात त्याचा मित्र मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.