कंटेनमेंट झोनची संयुक्त पाहणी- जिल्हाधिकारी, एसपी, आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

कन्टेनमेन्ट झोनमध्ये (प्रतिबंधीत) येतो. या भागात सध्या काय परिस्थिती आहे त्याची संयुक्त पाहणी सोमवारी (ता. एक) सांयकाळी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांचा सहभाग होता

नांदेड : शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कन्टेनमेन्ट झोन तयार करण्यात आले आहेत. ज्या भागातून कोरोना बाधीत रुग्ण आढळत आहेत हा परिसर कन्टेनमेन्ट झोनमध्ये (प्रतिबंधीत) येतो. या भागात सध्या काय परिस्थिती आहे त्याची संयुक्त पाहणी सोमवारी (ता. एक) सांयकाळी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांचा सहभाग होता.

संयुक्तरित्या पाहणी केलेल्या भागातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. गुरुद्वारा व लंगरसाहिब झोन बाबतचा निर्णय नियमाप्रमाणेच राहील असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. शहरातील गुरुद्वारा परिसर लंगरसाहिब, लोहार गल्ली, नई आबादी, विवेकनगर, कुंभार टेकडी, करबला रोड, मिल्लतनगर, रहेमतनगर या भागात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने हे परिसर कंटेनमेंट करण्यात आलेले आहेत. सर्वाधिक रुग्ण गुरुद्वारा परिसरात सापडल्याने लंगर साहिब गुरुद्वारा व सचखंड गुरुद्वारा परिसरात कंटेनमेंट झोन कडक करण्यात आले होते.

हेही वाचा -  विधायक : लॉकडाउनमध्ये बाप- लेकाने खोदली विहीर, पाणी प्रश्न कायमचा मिटवला

कंटेनमेन्ट झोनची संयुक्त पाहणी

मात्र शासनाच्या निर्णयानुसार शहरातील बऱ्याचशा अस्थापना, व्यवसाय व उद्योग सुरू झाले आहेत. कंटेनमेंट झोन परिसरातही मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. त्या दुकानांना उघडण्याची संधी द्यावी अशी मागणी या भागात राहणारे प्रतिष्ठित व्यापारी व नागरिक करत आहेत. एकंदरीत शहरातील कंटेनमेंट झोनबाबत माहिती घेऊन स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तसेच महापालिका आयुक्त यांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत लंगरसाहिब गुरुद्वाराचे बाबा बलविंदरसिंग, सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे रवींद्रसिंग बुंगई यांची उपस्थिती होती. कंटेनमेंट झोन उठविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या स्पष्ट सूचना आहेत. त्यामुळे त्या सूचनानुसारच निर्णय घेता येणार आहे. 

धार्मिकस्थळाबाबत आठ जून रोजी निर्णय अपेक्षीत

पाचव्या टप्प्यात लॉकडाऊन प्रक्रिया सुरू झाली आहे. धार्मिक स्थळाबाबत आठ जून रोजी निर्णय केंद्रस्तरावर अपेक्षित आहे. त्यावेळी जे काही निर्णय होईल त्यानुसार सूचना प्राप्त होतील व त्या सूचना मिळाल्यानंतर स्थानिक स्तरावर काही निर्णय घेता येऊ शकतील असेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 

येथे क्लिक करा - फायरींग करून व्यापाऱ्याला लुटले, मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकले

लॉकडाउनचे सर्वांनी नियम पाळा

जिल्हा प्रशासनाने दोन्ही गुरुद्वारामार्फत भाविकांना आवाहन करण्याची विनंती करण्यात आली असून शहरातील पीरबुऱ्हाणनगर येथील कंटेनमेंट झोन हटविण्याबाबत जे नियम लावण्यात आले होते तेच नियम इतर कंटेनमेंट झोनलाही लागू राहतील. असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे, वजिराबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप शिवले आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक शरद मरे यांचीही उपस्थिती होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Joint Inspection of Containment Zone - Collector, SP, Commissioner nanded news