राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे प्रलंबीत प्रकरणातून पिडीतांना न्याय- प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप

प्रल्हाद कांबळे
Thursday, 5 November 2020

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे ता. १२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड : राष्‍ट्रीय लोकअदलातीलच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेले खटले व विविध विभागामध्ये खेटे मारुन न्याय मिळत नसलेल्यांना या माध्यमाद्वारे न्याय देण्यात येतो. तसेच न्यायालयीन कामकाजावरील ताण कमी होऊन  प्रलंबीत खटले निकाली काढण्यास मदत होते. त्यामुळे येणाऱ्या ता.१२ डिसेंबर रोजी आयोजीत केलेल्या लोकअदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून निकाली काढावेत असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप यांनी केले आहे. 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे ता. १२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय, नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय, नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

हेही वाचापाचशे परिचारिकांवर पुन्हा बेकारीची कुऱ्हाड , २० पैकी १४ शासकीय कोविड सेंटर बंद, जेवणही दिले जात नसल्याची तक्रार

थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार 

सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज तसेच विविध बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे सदर लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय, सदर लोकअदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणांसोबतच विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 

येथे क्लिक करा - लेकीचे कुंकू पुसणाऱ्या तलाठी बापास अटक- पोलिस अधीक्षक राकेश कलासागर

विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व सन्माननीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. सदर राष्ट्रीय लोकअदालतीत मोठ्या संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप आणि जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचीव तथा न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले असुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तरी सर्व संबंधित पक्षकारांनी ता. १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबीत प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Justice to the victims of the case pending by the National Lok Adalat PDJ Shriram Jagtap nanded news