esakal | किनवटमध्ये केंद्र सरकारचा पुतळा जाळला तर नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवून केला निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

माकपच्या वतीन केंद्र सरकारचा निषेध

किनवटमध्ये केंद्र सरकारचा पुतळा जाळला तर नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवून केला निषेध

sakal_logo
By
टीम सकाळ

किनवट ( जिल्हा नांदेड ) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनसंघटनांच्या वतिने बुधवारी (ता. २६) देशव्यापी निषेधाची हाक देण्यात आली होती. या देशव्यापी हाकेला प्रतिसाद देत मा.क.पा व किसान सभेच्या वतिने तालुक्यात अनेक ठिकाणी काळे झेंडे लावत व मोदी सरकारचे प्रतीकात्मक पुतळे जाळत निषेध नोंदविण्यात आला. तसेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरही काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारचा निषेध केला.

सहा महिण्यापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेत तिन शेतीविरोधी काळे कायदे रद्द करा, बेसुमार वाढणारी महागाईवर नियंञन आणा. लाॅकडाउनच्या काळात केरळ, तामिळनाडूच्या धरतीवर सर्व सामान्य लोकांना सात हजार रुपये जगण्यासाठी द्या, सर्व गरिब गरजुंना १० किलो राशन मोफत द्या, आरोग्य व्यवस्था सक्षम करा, बेड- वेटिलेटेरंची व्यवस्था करा, सर्वांना तात्काळ मोफत लस द्या, सर्व विद्यार्थीची शैक्षणिक शुल्क माफ करा, बेरोजगारांना बेरोजगार भत्ता द्या, खत-बियांनाचे वाढीवर भाव वापस घ्या, या मागण्या घेऊन केद्रं सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - कोरोना काळात एसटी कर्मचारी सातत्याने सेवा बजावत आहेत. मात्र...

आंदोलनांतर्गत ठिक-ठिकाणी घरांवर काळे झेंडे लावण्यात आले. तथा प्रतीकात्मक मोदी सरकारचा पुतळा ठिक ठिकाणी जाळण्यात आला. किनवट येथे काॅ.अर्जुन आडे ,काॅ.जनार्दन काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. तर तालुकाभरात नंदगाव, शिवणी, लोखंडवाडी, सोनवाडी, पांगरी, तोटंबा, नागापूर, दिपलानाईक तांडा, गोकुंदा, चंद्रुनाईक तांडा, बुरकुलवाडी, आप्पारापॆठ इत्यादी ठिकाणी जोरदार आंदोलन आणि निषेध करण्यात आला. या वेळी आंदोलनात नंदकुमार मोदुकवार, प्रशांत जाधव, शेषराव ढोले, प्रभाकर बोड्डेवार, आनंद लव्हाळे, परमेश्वर गायकवाड, मनोज सल्लावार, इरफान पठाण, बालाजी, ब्रम्हा अंकुलवार, तानाजी राठोड, शिवाजी किरवले, स्टॅलिन आडे, यल्लया कोतलगाम, प्रदीप जाधव, अमोल आञाम, सुनिल राठोड, मनोहर आडे, पवन जेकेवाड, सुशील ढेरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

नांदेड : शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घ्या व केंद्र सरकारने चालविलेली हुकूमशाही बंद करा या सह इतर मागण्या घेऊन ता. 26 मे रोजी देशव्यापी आंदोलन करण्याची हाक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आली होती. कारण 26 मे रोजी दिल्ली येथील आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले असून त्या आंदोलनात आता पर्यंत 410 शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन ते शहीद झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर प्रातिनिधीक स्वरूपात आंदोलन करण्यात आले.

येथे क्लिक करा - धन्यवाद नरेंद्र मोदी' म्हणत सुशांतने केली उपरोधिक टिका

कोविड काळात जिवाची पर्वा न करता आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा व इतर कर्मचाऱ्यांना विना मोबदला राबवून घेतले जात आहे. शेतकरी व कामगारांना वेठीस धरून जनविरोधी धोरणे राबविणा-या सरकारचा प्रतिकात्मक अंत्यविधी करुन निदर्शने केली आहेत. या आंदोलनात सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. उज्वला पडलवार, कॉ. मारोती केंद्रे, कॉ. शेख मगदूम पाशा, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. सं. ना. राठोड, कॉ. दातोपंत इंगळे, कॉ. द्रोपदा पाटीलसह इतर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.