नांदेडला कोविड - नॉन कोविड रुग्‍णांसाठी एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित

अभय कुळकजाईकर
Wednesday, 30 September 2020

कोविड - नॉन कोविड रुग्‍णांसाठी सीटी स्‍कॅन सारख्‍या तपासण्‍यांची आवश्‍यकता भासत आहेत.  तपासणीसाठी खाजगी रुग्‍णालये किंवा सीटी स्‍कॅन तपासणी सुविधा उपलब्‍ध असलेल्‍या तपासणी केंद्राकडून अवाजवी रक्‍कम आकारण्‍याबाबतच्‍या तक्रारी जनतेकडून, लोकप्रतिनिधीकडून शासनाकडे प्राप्‍त झाल्‍या आहेत. त्यामध्ये नमुद तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक आहे.

नांदेड - जिल्ह्यातील कोविड - नॉन कोविड रुग्‍णांसाठी वापरण्यात येणाऱ्या १६ ते ६४ स्‍लाईस क्षमतेच्‍या मशिन्‍ससाठी एचआरसीटी चाचणीचे दर शासनाने निश्चित केले आहेत. याबाबत जिल्हादंडाधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
 
कोविड - नॉन कोविड रुग्‍णांसाठी सीटी स्‍कॅन सारख्‍या तपासण्‍यांची आवश्‍यकता भासत आहेत.  तपासणीसाठी खाजगी रुग्‍णालये किंवा सीटी स्‍कॅन तपासणी सुविधा उपलब्‍ध असलेल्‍या तपासणी केंद्राकडून अवाजवी रक्‍कम आकारण्‍याबाबतच्‍या तक्रारी जनतेकडून, लोकप्रतिनिधीकडून शासनाकडे प्राप्‍त झाल्‍या आहेत. त्यामध्ये नमुद तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील बाभळी प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी प्रयत्न सुरू

तपासणीसाठी कमाल दर मर्यादा ठरवली
मशिनच्‍या क्षमतेनुसार एचआरसीटी चाचणी तपासणीसाठी कमाल दर मर्यादा पुढीलप्रमाणे निश्चित करण्‍यात आली आहे. यात एक ते १६ स्लाईस सीटीसाठी दोन हजार रुपये, मल्टी डिटेक्टर सीटी मशीनच्या १६ ते ६४ स्लाईससाठी अडीच हजार रुपये तर ६४ स्लाईसपेक्षा अधिक मल्टी डिटेक्टर सीटी मशीनसाठी तीन हजार रुपये दर निश्चित केला आहे. या कमाल रकमेत सी. टी. स्‍कॅन तपासणी, तपासणी अहवाल सी.टी.फिल्‍म, पी.पी.ई किट, डिसइन्‍फेक्‍टंट, सॅनिटायझेशन चार्जेस व जीएसटी या सर्वांचा समावेश आहे.
 
डॉक्‍टरांच्‍या प्रिस्‍क्रीप्‍शन्‍सशिवाय तपासणी नको
एचआरसीटी - चेस्ट नियमित व तातडीच्‍या तपासणीसाठी वरील समान दर लागू रहातील. ता. २४ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित होण्‍याच्‍या दिनांकापुर्वी जर कोणत्‍याही रुग्‍णालय, तपासणी केंद्राचे एचआरसीटी -चेस्ट तपासणी दर वरील दरापेक्षा कमी असल्‍यास, कमी असलेले दर तपासणीसाठी लागू राहतील. एचआरसीटी - चेस्ट तपासणी केल्‍यानंतर अहवालावर कोणत्‍या सीटी मशीनव्‍दारे तपासणी केली आहे ते नमुद करणे बंधनकारक असेल. सद्यस्थितीत कोणत्‍याही डॉक्‍टरच्‍या प्रिस्‍क्रीप्‍शन्‍स शिवाय एचआरसीटी करण्‍याची मागणी नागरीकांकडून करण्‍यात येते. या तपासणीमध्‍ये किरणोत्‍सर्जनव्‍दारे तपासणी असल्‍याने जोखीम असते यासाठी नोंदणीकृत डॉक्‍टरांच्‍या प्रिस्‍क्रीप्‍शन्‍स शिवाय ही तपासणी करु नये.
 
हेही वाचलेच पाहिजे - नांदेड जिल्ह्यात प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या एस.टी.बसेस 

तपासणी अहवाल देणे आवश्‍यक 
एचआरसीटी - चेस्ट तपासणी करणाऱ्या रेडीओलॉजिस्‍टने संपुर्ण तपासणी अहवाल देणे आवश्‍यक राहील. (Apart from lung, mediastinum and bones) ज्‍या रुग्‍णांकडे आरोग्‍य विमा योजना आहे किंवा एखाद्या रुग्‍णालयाने किंवा कार्पोरेट, खाजगी आस्‍थापनेने जर एचआरसीटी तपासणी केंद्राशी सामंजस्‍य करार केलेला असेल त्‍यासाठी उपरोक्‍त दर लागु राहणार नाहीत. अन्‍यथा सर्व रुग्‍णालये, तपासणी केंद्रांनी एचआरसीटी - चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेले दर (मशिनच्‍या प्रकारानुसार) दर्शनी भागात लावणे तसेच निश्चित दरानुसार दर आकारणी करण्‍याबाबत हॉस्‍पीटल व्‍यवस्‍थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील. एचआरसीटी - चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेल्‍या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्‍यास संबंधितांवर कारवाई करण्‍यासाठी राज्‍यस्‍तरावर मुख्‍य कार्यकारी अधिकारी राज्‍य आरोग्‍य हमी सोसायटी व जिल्‍हास्‍तरावर (महानगरपालिका क्षेत्र वगळून) संबंधित जिल्‍हाधिकारी व संबंधित महापालिका क्षेत्रात संबंधित महापालिका आयुक्‍त नमूद केलेल्‍या कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्‍यास सक्षम प्राधिकारी राहतील. हे दर आकारणी साथरोग कायद्याची अंमलबजावणी असेपर्यंत चालू राहतील, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परीपत्रकान्वये कळविले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kovid - HRCT test rates fixed for non-Kovid patients, Nanded news