esakal | भाजपा वैद्यकीय आघाडीकडून ‘या’ नेत्याचा जाहिर निषेध, कोणत्या ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

खासदार संजय राऊत यांचा जाहीर निषेध करीत सर्व डॉक्टरांची त्यांनी जाहीर माफी मागावी तसेच खासदार पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

भाजपा वैद्यकीय आघाडीकडून ‘या’ नेत्याचा जाहिर निषेध, कोणत्या ते वाचा...

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शिवसेनेचे मुख्य फळीतील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टरपेक्षा कंपाउंडर बरे असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याबद्दल खासदार संजय राऊत यांचा जाहीर निषेध करीत सर्व डॉक्टरांची त्यांनी जाहीर माफी मागावी तसेच खासदार पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र राज्यातर्फे शुक्रवारी (ता. 21) जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टरपेक्षा कंपाउंडर बरे असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे संपूर्ण कोरोना योद्ध्यांचा अपमान झाला आहे. कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर हे एक प्रकारे देवदूत म्हणून काम करीत आहेत. एकीकडे महाराष्ट्र सरकारच्या प्रशासन आरोग्य वैद्यकीय क्षेत्रातील समन्वयाचा अभाव असल्याने राज्यात कोरोणा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहेत. अनेक महिन्यापासून डॉक्टरांचे पगार देण्यात आलेली नाही. तरीदेखील ते एक मिशन म्हणून सेवा देत आहेत. 

हेही वाचा गणेशोत्सव श्रद्धापूर्वक साजरा करा- आमदार बालाजी कल्याणकर

वक्तव्य लज्जास्पद व अपमानजनक 

त्यांच्या कार्यासाठी त्यांना स्फूर्ती किंवा शाबासकीची थाप देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाचे नेत्यानी केलेले हे बेताल वक्तव्य लज्जास्पद व अपमानजनक आहे. त्यांच्या या वक्तव्याचे जाहीर निषेध करत त्यांनी त्ताकाळ आपल्या पदाचा राजिनामा द्यावा अशी मागणणीकरण्यात आली आहे. डॉक्टरांचे खच्चीकरण झाल्यास सुरु असलेल्या माहामारीच्या साथिला नियंत्रणात आणणे अवघड जाणार असल्याचे वैद्यकिय क्षेत्रातून बोलल्या जात आहे. 

यांच्या आहेत निवेदनावर स्वाक्षऱ्या

दिलेल्या निवेदनाद्वारे भाजपा वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, जिल्हा संयोजक वैद्यकीय आघाडी नांदेड महानगरचे डॉ. सचिन पाटील उमरेकर, जिल्हा संयोजक नांदेड ग्रामीणचे डॉ. गंगा प्रसाद डोंगरगावकर, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. राहूल अन्वेकर, डॉ. आदेश दगडपल्ले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अविनाश भुरके, डॉ. गोविंद लोणीकर, डॉ. माधव ढगे, डॉ. अभिजित देवघरे, डॉ. प्रमोद सुनील आणि हनुमंत पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत त्यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील डॉक्टरांची माझा जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.