esakal | मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा अन्यथा उग्र आंदोलन करु स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा सरकारला इशारा 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

मराठा आरक्षणाच्या स्थगितीस राज्य सरकार, मराठा आरक्षण कृती समिती उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह केंद्र सरकारदेखील तितकेच जबाबदार आहे. केवळ राज्यात भाजपचे सरकार नसल्याने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहे. सर्वच राजकीय पक्ष मिळून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा अन्यथा उग्र आंदोलन करु स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा सरकारला इशारा 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती लवकरात लवकर उठवण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या घरासमोर जागर आंदोलन करण्यात येईल, यानंतरही स्थगिती उठवली गेली नाही तर, उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवसरकर यांनी दिला आहे. 

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे बुधवारी (ता.१६) पत्रकार परिषदेत श्री. देवसरकर यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणाच्या स्थगितीस राज्य सरकार, मराठा आरक्षण कृती समिती उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह केंद्र सरकारदेखील तितकेच जबाबदार आहे. केवळ राज्यात भाजपचे सरकार नसल्याने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहे. सर्वच राजकीय पक्ष मिळून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप श्री. देवसरकर यांनी केला आहे. 

हेही वाचा- नांदेडला ३२५ रुग्ण कोरोनामुक्त, २५५ जण पॉझिटिव्ह; नऊ बाधितांचा मृत्यू ​

असे असेल आंदोलन

ता. १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन असल्याने मराठवाड्यातील अनेकांनी या दिवशी बलिदान देऊन निजामांच्या तावडीतून मराठवाड्याची सुटका करून घेतल्याने या दिवशी कुठलेही आंदोलन करू नये. ता.३० सप्टेंबरपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणास स्थगिती उठली नाही तर लोकप्रतिनिधींच्या घरासमोर जागर आंदोलन करण्यात येणार असून, ता. एक ऑक्टोबरला शिवसेनेचे उत्तर नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर, ता. दोन रोजी कॉँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे, ता. तीन रोजी आमदार माधव पाटील जवळगावकर, ता. चार रोजी आमदार श्‍यामसुंदर शिंदे, ता. पाच रोजी भाजपचे आमदार राजेश पवार, ता. सहा रोजी भाजपचे आमदार राम पाटील रातोळीकर, ता. सात रोजी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, ता. आठ रोजी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील तर ता. नऊ रोजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर जागर आंदोलन केले जाणार आहे. 

हेही वाचले पाहिजे- धक्कादायक : नांदेड जिल्ह्यातील ‘हा’ पाझर तलाव फुटून शेकडो हेक्टर शेती गेली खरडून

वर्षा गायकवाड यांचा सन्मान राखला

त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठवली गेली नाही, तर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेटच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर आल्यामुळे त्यांना सन्मानाची वागणूक दिली अन्यथा त्यांचा दौरा देखील होऊ दिला नसल्याचे श्री. देवसरकर यांनी सांगितले.