esakal | नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने आठ लाखांचे ५१ मोबाईल काढले शोधून
sakal

बोलून बातमी शोधा

nanded

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने आठ लाखांचे ५१ मोबाईल काढले शोधून

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड: जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून गहाळ झालेले आठ लाख एक हजार नऊशे रुपयाचे मोबाईल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधले आहेत. पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी याबाबत पथकाचे कौतुक केले आहे. नांदेड शहर व जिल्ह्यात सार्वजनिक व आठवडी बाजारात महागडे मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वाढत असल्याने त्याच्या नोंदी संबंधित पोलिस ठाण्यात होत असत. त्यामुळे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सूचना दिल्या. त्यानंतर पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक कार्यरत केले आणि शोध सुरू केला.

वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अठरा, शिवाजीनगर हद्दीतील आठ, भाग्यनगर हद्दीतील नऊ, विमानतळ हद्दीतील पाच, इतवारा हद्दीतील तीन, नांदेड ग्रामीण हद्दीतील सहा तसेच कंधार आणि देगलूर हद्दीतील प्रत्येकी एक असे एकूण ५१ मोबाईलचा शोध लाऊन ताब्यात घेतले आहेत. त्याची किंमत अंदाजे आठ लाख एक हजार नऊशे रुपये असल्याची माहिती पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी दिली.

हेही वाचा: Maratha Reservation: आरक्षणासाठी ‘छावा’ घेणार आक्रमक भूमिका

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद मुंडे, पोलिस हवालदार चांद शेख, गंगाधर कदम, सखाराम नवघरे, संजय केंद्रे, दशरथ जांभळीकर, पोलिस नाईक विश्वनाथ इंगळे, बालाजी तेलंग, पोलिस शिपाई विठ्ठल शेळके, बजरंग बोडके, गणेश धुमाळ, विलास कदम, पोलिस नायक राजू सिटीकर, श्री ओढणे यांनी परिश्रम घेतले.

loading image