लॉकडाउन : ‘या’ शहरातील वाहनधारकांना तीन कोटींचा दंड 

file photo
file photo

नांदेड : लॉकडाउनचे नियम तुडवून विनापरवाना बेकायदेशीरपणे शहरातून फिरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांची वाहने जप्त केली होती. ती वाहने चालकांनी दंडाची रक्कम जमा करुन वाहनमालकांनी घेऊन जावे असे आवाहन शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी केले आहे. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन सुरू आहे. या काळात नांदेडमध्येही लॉकडाउनचे नियम वाहनाधारकांनी तोडु नये म्हणून शहर वाहतुक शाखेचे कर्मचारी रस्त्यावर तळ ठोकून कर्तव्यावर होते. मात्र लॉकडाउनमध्ये कामाशिवाय घराबाहेर पडणाऱ्या वाहनधारकांना वाहतुक शाखेच्या दंडात्मक कारावईला सामोरेजावे लागले. एवढेच नाही तर त्यांची वाहने जप्त करण्यात आली होती. दोन महिण्यात जवळपास वाहतुक शाखेने ५५ हजार केसेस करुन तीन कोटीहून दंड आकारला होता. हे चलन आॅनलाईन असल्याने त्या वाहनावर दंडाचा बोजा पडलेला आहे. आज ना उद्या हा दंड भरावाच लागणार आहे. 

५५ हजार केसेसद्वारे तीन कोटीचा महसुल 

५५ हजार वाहनधारकांवर दंडात्मक केसेस करुन त्यातून मोठा महसुल जमा केला आहे. एक हजार २९ वाहने (ज्यात ॲटो, दुचाकी आणि चारचाकी ) जप्त केली होती. त्यातील ९५४ वाहन धारकांकडून दंड वसुल करून सोडण्यात आली. उर्वरीत ७५ वाहने वाहनधारकांनी घेऊन जावे असे आवाहन करण्यात आले. शहरातील लॉकडाउन अजुनही उठविण्यात आला नसुन वाहनधारकांनी कामाशिवाय वाहने रस्त्यावर आणु नये. तसेच काही वाहनांना अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे. दिलेल्या परवानगीनुसार वाहने चालवावीत असेही आवाहन करण्यात आले आहे. 

इतवारा उपविभागातील शहर वाहतुक एपीआयच्या खांद्यावर
 
शहरातील वाहतुक शाखेचे विभाजन करून शाखा क्रमांक एक व दोन असे भाग केले. मात्र भाग दोन इतवारा परिसरातून पाहिजे असी कारवाई होत नसल्याचे त्यांच्या कारवायावरून दिसून येते. सध्या या इतवारा विभागाची जबाबदारी एका सहाय्यक पोलिस निरीक्षकांवर देण्यात आली आहे. परंतु एक क्रमांक असलेल्या शाखेचा कारभार नेहमीच अव्वल राहिलेला आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या बळावर मोठा दंडातून महुसल शासनाच्या तिजोरीत टाकला आहे.  वाहनधारकांनी जप्त वाहने घेऊन जावेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com