Nanded Crime News : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार, युवकावर गुन्हा दाखल

आरोपीने पीडितेसोबत काढलेली अश्लील छायाचित्रे, तिच्या नातेवाईकांना पाठवून लग्न मोडण्याचा प्रयत्न केला.
lure of marriage abuse girl police action crime against youth markhel nanded
lure of marriage abuse girl police action crime against youth markhel nandedEsakal

मरखेल : लग्नाचे आमिष दाखवून स्वतःच्या शेतात नेऊन २२ नोव्हेंबर २०२३ ते ४ जानेवारीदरम्यान वारंवार बळजबरी शारीरिक संबंध ठेवत तिचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्या युवकावर अत्याचार व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार मरखेल पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. सचिन शंकर राठोड (वय २५, रा. हणेगाव) असे आरोपीचे नाव आहे.

सचिन शंकर राठोड याने गावातील युवतीस लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यासोबत स्वतःच्या वझर रोडवर असलेल्या शेतात नेत २२ नोव्हेंबर २०२३ ते ४ जानेवारीदरम्यान शारिरीक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान या पीडित युवतीचे घरच्या लोकांनी लग्न जमवले असताना आरोपीने सदर कृत्यातील पीडितेसोबत काढलेली अश्लील छायाचित्रे, तिच्या नातेवाईकांना पाठवून लग्न मोडण्याचा प्रयत्न केला.

समाजमाध्यमांवर फोटो टाकले. त्यामुळे याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून मरखेल पोलिसांनी सचिन शंकर राठोड यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यास तेलंगणातील हैद्राबाद येथून ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास गोबाडे हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com