नांदेड : महाकृषी ऊर्जा अभियान : कृषिपंपाच्या थकबाकी मुक्तीचा समृध्द मार्ग- चंद्रसेन पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जि. प. सदस्य पाटील यांनी दोन लाखांचा भरणा करत दोन लाखांची मिळवली भरघोस सुट; शेतकऱ्यांनी कृषी ऊर्जा पर्वाचा लाभ घेण्याचे केले आवाहन

नांदेड : महाकृषी ऊर्जा अभियान : कृषिपंपाच्या थकबाकी मुक्तीचा समृध्द मार्ग- चंद्रसेन पाटील

नांदेड : महाकृषी ऊर्जा अभियानाच्या धोरणांचा कृषिपंप थकबाकीतील विलंब आकार व व्याजाच्या माफीतून मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेत माळाकोळी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन ईश्वरराव पाटील यांनी तब्बल दोन लाख 938 रुपयांची  सुट मिळवत देान लाख 18 हजार 850 रूपयांचे कृषिपंपाच्या वीजजोडणीचे बील भरून आपले बील कोरे केले आहे. महाकृषी ऊर्जा अभियान हे सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारे अभियान आहे. या धोरणानुसार थकबाकीत मिळणारा दिलासा म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या समृध्दीचा महामार्गच असल्याचे विचार श्री पाटील यांनी व्यक्त केले.

लोहा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या गौंडगाव गावात श्री चंद्रसेन ईश्वरराव पाटील यांच्याकडे पाच कृषीपंप वीजजोडण्या आहेत. या पाच वीजजोडण्यांची चार लाख 19 हजार 788 रूपयांची थकबाकी होती. महा कृषी ऊर्जा पर्वाच्या निमित्ताने नांदेड ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांनी जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील यांना प्रत्यक्ष भेटून महा कृषी ऊर्जा अभियानाच्या धोरणाची माहिती दिली. महाकृषी ऊर्जा अभियानाच्या धोरणांतर्गत निर्लेखना नंतर विलंब आकार व व्याजाच्या शंभर टक्के माफीच्या सवलतीच्या आधारे ऊर्जा पर्वाच्या निमित्ताने मिळालेल्या संधीचा लाभ घेत चंद्रसेन पाटील यांनी तब्बल दोन लाखांची भरघोस सुट मिळवत दोन लाख रुपयांचा वीज बील भरणा केला.

हेही वाचा नांदेड जिल्ह्यात आजपासून ता. चार एप्रिलपर्यंत संचारबंदी 

यावेळी चंद्रसेन पाटील यांनी माळाकोळी सर्कल मधील सर्व थकबाकीदार कृषी पंप ग्राहकांना महाकृषी ऊर्जा अभियानाचे महत्व पटवून देवून सर्व शेतकऱ्यांचा सहभाग कसा वाढेल यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सोबतच थकबाकी वसूलीतून मिळणारी 66 टक्‌के रक्कम ही त्या त्या गावातील वीजयंत्रणा सक्षम करण्यावरच खर्च केली जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले.

 
याप्रसंगी कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण, यांच्या हस्ते चंद्रसेन पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कंधार उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता महेश वाघमारे, उच्चस्तर लिपिक राजकुमार सिंदगीकर हे उपस्थित होते.

टॅग्स :LohaNandedKandahar