Nanded | वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nanded | वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

अर्धापूर (जि.नांदेड) : शहरातील अशोकनगरात घरगुती वापराचे थकीत विजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अर्धापूर (Ardhapur) पोलिस ठाण्यात गुरूवारी (ता.२४) एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की महावितरण कंपनीचे (Mahavitaran Company) कर्मचारी गजानन सदाशिव आलबत्ते हे गुरूवारी सकाळी शहरातील अशोकनगर भागातील अनुसयाबाई गणपतराव भालेराव यांचे थकित वीजबिल वसुली करण्यासाठी गेले होते. (Mahavitaran Employee Beaten Who Went For Bill Payment In Ardhapur Of Nanded)

हेही वाचा: श्रीलंकेत अन्न व पाण्यासाठी मारामारी ! दोन हजार रुपयाला १ लिटर दूध मिळतयं

वीज बिलाची मागणी व मीटरचे छायाचित्र काढत असताना शेजारीच राहणारे राहुल संजय भालेराव हे आले. त्यांनी मीटरचे फोटो का काढतात म्हणून वाद घालत, शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच मोबाईल फोडुन टाकला अशी फिर्याद गजानन सदाशिव आलबत्ते यांनी दिली.

हेही वाचा: Aurangabad| धावत्या बसने घेतली पेट, चालकामुळे २८ प्रवाशांचा वाचला जीव

यावरुन राहूल संजय भालेराव यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Mahavitaran Employee Beaten Who Went For Bill Payment In Ardhapur Of Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedArdhapurmahavitaran
go to top