Ashok Chavan
esakal
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत स्थानिक स्तरावर मतभेद उफाळून आले.
हेमंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले.
आघाडी एकजुटीने निवडणुकीस सामोरी; महायुतीसाठी आव्हान
-रामेश्वर काकडे, नांदेड
Nanded Politics : नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत फूट पडल्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. भाजप (BJP), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांचे स्थानिक स्तरावर मतभेद उफाळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात महायुतीचे एकत्रित रणांगण निवडणुकीपूर्वीच मोडीत निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे आघाडीतील तिन्ही पक्ष सध्यातरी एकजुटीने मैदानात असल्याने खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची कसोटी लागणार आहे.