माहूरचे शासकीय वस्तुसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले | Nanded | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील मध्यवस्तीत असलेले पुरातन शासकीय वस्तुसंग्रहालय.
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून; माहूरचे

नांदेड : माहूरचे शासकीय वस्तुसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माहूर : नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर येथील पुरातत्व खात्याचे शासकीय वस्तुसंग्रहालय नुकतेच पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्याने पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथे (ता.१९) जानेवारी १९८६ रोजी पुरातत्त्व खात्यातर्फे शासकीय वस्तुसंग्रहालयाचे उद्‍घाटन करण्यात आले. तेव्हापासून हे संग्रहालय जनतेला तथा पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. या वस्तुसंग्रहालयात अनेक पुरातन दुर्मिळ वस्तू, बंजारा समाजाची भांडी व वस्त्र भूषणे, पुरातन नानी, ताम्रपट अनेक दगडी शिल्प, आदिवासी यांच्या वस्तू, तांबे, पितळेची भांडी, मातीच्या वस्तू सह अनेक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह या संग्रहालयात पहावयास मिळतो.

हेही वाचा: नाशिक : मागासवर्गीय वसतिगृहाचा निधी मिळावा

अशा दुर्मिळ वस्तूंचे संग्रहालय कोविड संसर्ग रोगामुळे मार्च २०१९ पासून शासनाने पर्यटकांसाठी बंद ठेवले होते. ते आता जागतिक वारसा दिन ता.१९ ते ता.२५ नोव्हेंबर निमित्त शासनाच्या आदेशानुसार या विभागाचे मुंबई येथील संचालक शतेजस गर्गे व अभिरक्षक मध्यवर्ती संग्रहालय सौ. वहाने यांच्या सुचने व आदेशनुसार अंदाजे वीस महिन्यापासून बंद असलेले वस्तुसंग्रहालय (ता.१६) नोव्हेंबर पासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्याची माहिती संग्रहालयाचे राखनदार सय्यद आजम पाशा यांनी दिली आहे. संग्रहालयात व्ही.एम.चिपळे, एम.पी चांदुरकर राखंनदार यांच्या मदतीला आहेत.

loading image
go to top