पीक कर्ज वाटप व जिल्हा विकासासाठी प्रयत्न करा- दिशा बैठकीत अधिकाऱ्यांची बोलती बंद

file photo
file photo
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील विविध विकास योजना, तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रताप पाटील चिखलीकर व सहअध्यक्ष खासदार हेमंत पाटील हे होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज ही बैठक संपन्न झाली.

या बैठकीस आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार भिमराव केराम, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या योजनेच्या कामाचा विस्तृत आढावा घेण्यात आला

बैठकीत सुरवातील 15 जुलै 2017 रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन व त्यास मान्यता देण्यात आली. यावेळी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या योजनेच्या कामाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मनुष्यआदिन निर्मिती –उद्दिष्ट व साध्य (2020 21) सेल्फवरील (मंजूर) कामे, मजूर उपस्थिती, सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरी, वैयक्तिक सिंचन विहिरी, दिनदयाळ अंत्योदय योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण, स्वच्छ भारत मिशन शहरी व ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, राष्ट्रीय भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, अमृत योजना, महावितरणची उज्ज्वल योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, सर्व शिक्षा अभियान, शालेय व पोषण आहार योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजिटल इंडियाअंतर्गत ग्रामपंचायत इंटरनेट सुविधा, रेल्वे, भारत संचार निगम लिमीटेड, राष्ट्रीय महामार्ग या योजनांच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला. अध्यक्ष खासदार प्रताप पाटील चिखलीकर व सहअध्यक्ष खा. हेमंत पाटील यांनी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावाणीसाठी संबंधित यंत्रणेने त्वरीत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.

बँकानी शेतकऱ्यांना पिक विमा संदर्भात व वैयक्तीक लाभार्थ्यांना लाभ मिळण्याबाबत योग्य सहकार्य करावे

जिल्ह्यात ग्रामस्तरावर काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे तिथे विद्युत सुरळीत होण्याबाबत व भारत संचार निगम लिमीटेड अंतर्गतचे नेटवर्क अडचणीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. तसेच अशा अडचणी भविष्यात होणार नाहीत याची काळजी घ्यावी. बँकानी शेतकऱ्यांना पिक विमा संदर्भात व वैयक्तीक लाभार्थ्यांना लाभ मिळण्याबाबत योग्य सहकार्य करावे अशाही सूचना यावेळी संबंधित विभागांना दिल्या.बैठकीत अनुषंगीक योजना तसेच त्यातील कामाबाबत अहवाल संबंधीत यंत्रणांनी सादर केला. त्यावर उपस्थित समिती सदस्यांनी विविध मुद्यांवर चर्चा करुन उपयुक्त सूचना केल्या. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले व शेवटी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com