esakal | Nanded Accident : नांदेड-भोकर रस्त्यावर भरधाव जीपने मजुरास चिरडले
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातग्रस्त जीप

Nanded Accident : नांदेड-भोकर रस्त्यावर भरधाव जीपने मजुरास चिरडले

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) : नांदेड (Nanded)-भोकर रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपने साईबाबा मंदिर परिसरात मजुरास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.२३) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड- भोकर (Bhokar) रस्त्यावरील साईबाबा मंदिर परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपने (एमएच २२ एफ एम ८६४४) रस्त्यावरून जाणाऱ्या महमंद रमजान शरिफ (वय ३१, रा केलाजलालपूर, जिल्हा वैशाली , बिहार) यांना जबर (Accident In Nanded) धडक दिल्याने ते ग़भीर जखमी झाले.

हेही वाचा: नागपूर-शिर्डी महामार्गावरील वाहतूक बंद, वैजापूरमधील नदीला पूर

त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे भोकरफाटा परिसरात दुचाकी दुरूस्तीचे दुकान आहे. त्या़च्या मागे पत्नी, आई, वडील, मुलगा असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अरूण केंद्रे, ज्ञानेश्वर बसवते, पोलिस निरीक्षक अशोक जाधव, कल्याण मांगूळकर, शेख मजात, शेख एकबाल, श्रीराम कदम, प्रभाकर करडेवार , राजकुमार व्यवहारे यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली.

loading image
go to top