शासकिय योजनांची माहिती व लाभासाठी नांदेड तालुक्यात मंडळनिहाय कॅम्प 

file photo
file photo

नांदेड : जनतेला शासनाच्‍या विविध योजनांची माहिती व त्‍या योजनेचा लाभ तात्‍काळ मिळावा यादृष्‍टीकोणातून नांदेड तालुक्‍यात मंडळनिहाय कॅम्‍प घेवून शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ गरजू व्‍यक्‍तींना देण्यासाठी शासन निर्णय ता. ७ सप्टेंबर २०२० अन्वये व जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशानुसार कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड तालुक्‍यातील नागरिकांनी आपल्‍या मंडळातील कॅम्‍पला उपस्थिती नोंदवून विविध योजनांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.

नांदेड तालुक्‍यात पुढीलप्रमाणे मंडळनिहाय कॅम्‍प घेण्‍यात येणार आहे. नांदेड (फेमस फक्‍शन हॉल देगलूर नाका नांदेड) ता. २९ जानेवारी, नांदेड (ग्रामीण) ता. पाच फेब्रुवारी, तरोडा (बु) ता. १२ फेब्रुवारी, नाळेश्‍वर ता. २६ फेब्रुवारी, लिंबगाव ता. पाच मार्च, विष्‍षुपुरी ता. १२ मार्च, वसरणी ता. १९ मार्च, तुप्‍पा ता. २६ मार्च, वाजेगाव ता. नऊ एप्रिल याप्रमाणे मंडळनिहाय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सन्‍माननिय लोकप्रतिनिधी, जिल्‍हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिदार, सर्व यंत्रणेचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. नांदेड तालुक्‍यातील नागरिकांनी आपल्‍या मंडळातील कॅम्‍पला उपस्थिती नोंदवून विविध योजनांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.

महसूल विभागाअर्तगत‍ः विविध प्रमाणपत्रे (रहिवास, उत्‍पन्‍न, राष्‍ट्रीयत्‍व, जातीचे, नॉन क्रिमीलेअर) संजय गांधी, इंदिरा गांधी, योजनेचे अर्ज स्‍वीकारणे, पुरवठा विभागात EKYC करणे, नविन शिधापत्रिकांचे अर्ज स्विकारणे इत्‍यादी. महानगर पालीका / तालुका आरोग्य अधिकारी : आरोग्य तपासणी, लसीकरण दिव्‍यांग लाभार्थी यांचे अर्ज  स्विकारणे.

गटविकास अधिकारीः 

घरकूल योजनेचा आढावा व प्रलंबीत अनुदान देणे, दिव्‍यांग अॅपवर दिव्‍यांगाची नोंदणी करणे, विविध दाखले देणे, (जन्‍म, मृत्‍यू, विवाहनोंदणी, शौचालयदाखला, नमुना ८चा उतारा, विधवाअसल्‍याचा दाखला, विभक्‍त कुटुंबाचा दाखला, निराधार दाखला, मालमत्‍ता फेरफार प्रमाणपत्र, विज जोडणीसाठी नाहरकत, बेरोजगार असल्‍याचा दाखला). 

उपअधिक्षक भूमि अभिलेखः

मोजणी संदर्भात प्राप्‍त  तक्रारी, अर्जाचा निपटारा ड्रोन सर्वे संदर्भात माहिती देणे.

तालुका कृषी अधिकारीः 


बाळासाहेब ठाकरे कृषी व्‍यवसाय ग्रामीण परिवर्तन योजनाची माहिती,विविध औजारे व साहित्‍य  देणे,फळबाग लागवड,सुक्ष्‍म खादय उदयोग योजन,कृषी पायाभूत विकास निधी, फळबाग लागवड, व्‍हर्मी कंपोस्‍ट, नॅडेप कंपोस्‍ट, बांधावर वृक्षलागवड शेततळे इ. ठिंबक तुषार, रेशीम मत्‍स्‍यपालन, मधुमक्षिका, कुकूटपालन, रोपवाटीका लाभ  देणे फलोत्‍पादन योजना शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ देणे पिक विमा योजनेचा लाभ. 

महिला व बालविकास विभागः 

बचतगटाद्वारे स्त्रीयांचे संघटण करुन उद्योग व्‍यवसायाला चालना देणे, गरिबांचे हक्‍क,वित्‍तीय सेवा,बालविवाह रोकणे, प्रबोधण करणे, कुपोषीत बालकांची दर्जावृध्‍दी करणे, बचतगटाचे उपक्रमव साहित्‍य विक्री, बेटी बचाव बेटी पढाव मोहिम. सहायक निबंधक सह संस्‍थाः पिक कर्ज वाटप,तक्रारी निपटारा, मुद्रालोत प्रलंबीत तक्रारी, नैसर्गीक अनुदान आपत्‍ती अनुदान वाटप. 

तालुका पशुधन विकास अधिकारीः 

जनावरांचे लसीकरण,जनावरांचे पानवटे तयार करणे, गरजुंना जनावरांचे वाटप करणे. 


महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनीः 

विद्युत रोहीत्र मागणी व वितरण, विद्युत जोडणी, विद्युत बिल तक्रारी. याप्रमाणे लाभ देण्‍यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार किरण अंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com