
बॅंकांच्या शुल्कात भरमसाट वाढ
नांदेड - राष्ट्रीयकृत बॅंकांकडून विविध सेवा शुल्काच्या नावाखाली ग्राहकांच्या खात्यातून रकमा कपात केल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना या सेवा शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागत असून, त्यांच्यामध्ये संतापाचे वातावरण आहे.
राष्ट्रीयकृत बॅंकांसह विविध खासगी, सहकारी बॅंकांतूनही सेवा शुल्क म्हणून ग्राहकांच्या खात्यातून रक्कम वजा केली जात आहे. सुमारे वीस प्रकारचे सेवा शुल्क ग्राहकांकडून घेतले जातात. मिनिमम बॅलेन्स, डुप्लीकेट पासबुक, अकाऊंड मेंटेनन्स चार्जेस, चेक बुक चार्जेस, एटीएम अलर्ट अशा प्रकारचे सेवा शुल्व वसुल केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ही तर ग्राहकांची लूट
ग्राहकांकडून वसुल केल्या जाणाऱ्या सेवा शुल्काच्या संदेश ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर प्रत्येक वेळी येतात. मात्र कपात झालेल्या शुल्काची रक्कम २० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत असते. त्यामुळे या कपात रक्कमेविषयी ग्राहकांना फारसे गांभीर्य वाटत नाही. मात्र वर्षाच्या शेवटी एकदाच कपात रकमेचा लेखाजोखा केला तर किमान एक हजार रुपयांपर्यंत रक्कम होते. त्यामुळे ग्राहकांत संतापाची भावना आहे.
असे आहेत सेवा शुल्क (रुपयांमध्ये)
मिनिमम बॅलेन्स २००
डुप्लीकेट पासबुक ११८
अकाऊंट मेटेनन्स चार्जेस ३००
चेकबुक चार्जेस १००
खाते सक्रिय नसेल तर १००
चेक बाऊन्स दंड २००
बॅंक स्टेटमेंट १००
एटीएम अलर्ट १२
एटीएम मेंटेनन्स ११८
नवे एटीएम कार्ड २५०
एटीएम वार्षिक शुल्क २००
Web Title: Massive Increase In Bank Fees
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..