
Nanded Protest
sakal
नांदेड : सकल आदिवासी समाजाच्यावतीने अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आरक्षण वाचविण्यासाठी सोमवारी (ता. सहा) नांदेड येथे विराट ‘उलगुलान आरक्षण बचाव महामोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील विविध भागांतील हजारो आदिवासी बांधव, महिला, युवक व कलापथकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.