शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

गजानन पाटील
Thursday, 10 September 2020

मागील काही दिवसांपासून हदगाव हिमायतनगर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून या सततच्या पावसामुळे बऱ्यापैकी हाताला आलेले सोयाबीन व उडीद पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे हाताला आलेल्या पिकाची परिस्थिती पाहता शेतकरी नुसता हतबल झाला. त्यामुळे तो आर्थिक कोंडीत सापडला असून त्यांना मदत करणे हे शासनाचे कर्तव्य असून प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेशित करावे, अशीही मागणी जवळगावकर यांनी पुनर्वसनमंत्री यांच्याकडे मुंबई येथे प्रत्यक्षात भेटून केली आहे. 
 
हदगाव, (जि. नांदेड) ः मागील पंधरा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन व उडीद या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून परिणामी शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली. यावेळी मंत्री वडेट्टीवार यांनी निवेदन लक्षात घेत आयुक्तांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जवळगावकर यांनी सांगतिले. 

पिकांचे अतोनात नुकसान 
मागील काही दिवसांपासून हदगाव हिमायतनगर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून या सततच्या पावसामुळे बऱ्यापैकी हाताला आलेले सोयाबीन व उडीद पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे हाताला आलेल्या पिकाची परिस्थिती पाहता शेतकरी नुसता हतबल झाला. त्यामुळे तो आर्थिक कोंडीत सापडला असून त्यांना मदत करणे हे शासनाचे कर्तव्य असून प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेशित करावे, अशीही मागणी जवळगावकर यांनी पुनर्वसनमंत्री यांच्याकडे मुंबई येथे प्रत्यक्षात भेटून केली आहे. 

हेही वाचा -  हिंगोली : जिल्ह्यातील कृषीपंपांना अखंडीत वीजेसाठी रोहित्रांची पूर्तता करा-  डॉ.नितीन राऊत -

तालुका प्रशासनाला आदेशित करावे
सोयाबीन कंपनीने शेतकऱ्यांना सुरवातीला न उगवणाऱ्या बॅगा विक्री केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठे दुबार पेरणी तर काही ठिकाणी तिबार पेरणीचे संकट आले होते. त्या परिस्थितीत व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांना बॅगा बदलून दिल्या नाहीत. त्यामुळे यावर्षीच्या उत्पादनात शेतकरी नुकसानीत आहेत. त्यातच पिकावर रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव त्यामुळे अजूनही शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणे गरजेचे असून शासनस्तरावरून हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील सोयाबीन, उडीद पिकांचे पंचनामे करण्यासंदर्भात तालुका प्रशासनाला आदेशित करावे, अशीही मागणी राज्याचे पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. 

पिकाची नुकसान भरपाई मिळावी
मागील काही दिवसांपूर्वी हदगाव तालुक्यातील सहा गावांना शासनाकडून मिळणारे दुष्काळी अनुदान प्राप्त झाले नव्हते. ही बाब आमदार माधव पाटील जवळगावकर यांच्या लक्षात येताच त्यांनी शासनस्तरावर प्रयत्न करून हदगाव तालुक्यातील सहा गावांतील शेतकऱ्यांना चार कोटी १६ लाख रुपये अनुदान मंजूर करून दिले आणि ते अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे तहसीलदार यांना सूचना केल्या होत्या. आमदार जवळगावकर यांच्या तत्परतेने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांत त्यादरम्यान समाधानही व्यक्त करण्यात आले होते. त्यामुळे या पिकाची नुकसान भरपाई मिळावी, या अपेक्षेत शेतकरी बांधव दिसून येत आहेत. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Orders Administration To Help Farmers, Nanded News