आमदार भीमराव केराम यांची या समितीवर निवड

प्रल्हाद कांबळे
Friday, 4 September 2020

विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अशोक उईके आणि प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतिया यांनी ही निवड घोषित केली.

 नांदेड : भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर आमदार भीमराव केराम, प्रकाश तोटावांड, बाबुराव पुजारवाड यांच्यासह पाच जणांची निवड करण्यात आली आहे. विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अशोक उईके आणि प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतिया यांनी ही निवड घोषित केली.

भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर किनवट विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार भीमराव केराम यांच्यासह विशेष निमंत्रित म्हणून प्रकाश तोटावांड, बाबुराव पुजारवाड, विठ्ठलराव कुडमुलवार यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस म्हणून गोविंद अनुकूलवाड यांची तर कार्यकारणी सदस्य म्हणून किशन जैता मडावी यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अशोक उईके आणि प्रदेश चिटणीस श्रीकांत भारतीय यांनी ही निवड घोषित केली आहे.

हेही वाचाहिंगोली : घरकुलांसाठी एक कोटी सहा लाखाचा निधी प्राप्त- खासदार हेमंत पाटील 
यांची झाली निवड

या निवडीबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अशोक उईके आणि प्रदेश चिटणीस श्रीकांत भारतीय यांचे आणि प्रदेश कार्यकारिणीवर निवड झालेल्या सर्वांचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, माजी खा.डी.बी.पाटील, आ.डॉ.तुषार राठोड, आ.राम पाटील रातोळीकर, माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर, माजी आ.बापूसाहेब गोरठेकर, जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नांदेड महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांनी अभिनंदन केले आहे. सर्व सामान्य कार्यकर्त्यास प्रदेश कार्यकारिणीवर संधी मिळून दिल्याबदद्ल खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचेही आभार व्यक्त करण्यात येत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bhimrao Keram elected on this committee nanded news