‘या’ आमदारांनी घेतली सॅनिटायझरची फवारणी हाती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

नांदेड तालुक्यातील हसापूर व नसरतपूर या ग्रामिण भागात कोरोनाचा प्रादूर्भाव होउ नये म्हणून तिसऱ्यांदा सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे. नांदेड (उत्तर) चे आमदार बालाजी कल्याणकर यांचा पुढाकार

नांदेड : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता हसापूर (ता. नांदेड) गावात आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडून तिसऱ्यांदा सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. 

हसापूर गाव दोन महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा निर्जंतुकीकरण करण्यात आले. शिवसेनेचे तालुका संघटक नवनाथ काकडे यांच्या वतीने निर्जंतुकीकरण प्रत्येक घराच्या दारावर, खिडकीवर फवारणी करण्यात आली. शिवसेनेचे गौरव कोटगिरे यांच्या वाहनाद्वारे फवारणी करण्यात आली. हसापुर हे गावात फवारणी करून सायंकाळी नसरतपुर येथे आमदार कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आली. सदरील कामाचे आ. कल्याणकर यांनी कौतुक केले. 

नसरतपुर हे गाव संपूर्ण निर्जंतुकीकरण 

नसरतपुर या गावातील विकास कामांची मागणी आ. कल्याणकर यांच्याकडे केली. तत्काळ आ. कल्याणकर यांनी तुमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन गावकऱ्यांना दिले. यावेळी उपस्थित शिवसेनेचे तालुका संघटक नवनाथ काकडे, धनंजय पावडे, गावातील ज्येष्ठ शिवसैनिक रंगनाथ सरोदे, रामेश्वर काकडे, रावसाहेब काकडे, ज्ञानेश्वर काकडे, विठ्ठल काकडे, प्रदीप सरोदे, गजानन सरोदे, बळीराम सरोदे, सिताराम सरोदे व शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा -  खासगी बस मालकांच्या काय आहेत मागण्या...?

कत्तलीसाठी जाणाऱ्या पाच गोवंशची सुटका 

नांदेड : कत्तलीसाठी जाणाऱ्या पाच गोवंशाची इतवारा पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई देगलूर नाका परिसरात शनिवारी (ता. सात) सकाळी साडेसात वाजता केली. 

इतवारा पोलिस ठाण्याचे एक पथक शनिवारी रात्री आपल्या हद्दीत देगलूरनाका परिसरात गस्त घालत होते. यावेळी लक्ष्मीनगर भागात फौजदार दत्तात्रय काळे यांना एका मोकळ्या भखंडावर पाच गोवंश (बैल) बांधलेली दिसली. पोलिसांना संशय आल्याने तेथे जावून या गोवंशाची विचारपूस केली. यावेळी ती गोवंश मोहमद वाजीद मो. बाबु कुरेशी यांची असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला या गोवंशाची कागदपत्रे विचारली. यावेळी त्याच्याकडे कुठलेच दाखले नसल्याने ही गोवंश कत्तलीसाठी आणल्याची कबुली त्यांने पोलिसांना दिली.

येथे क्लिक करा - ...तरच तुम्हाला ही जिंकता येईल जग कसे चे वाचा

इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

यावेळी पाचही गोवंश जप्त करून मोहमद वाजीद याला इतवारा पोलिस ठाण्यात आणले. पोलिस हवालदार गणपत पेदे यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेली गोवंश गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This MLAs took up sanitizer spraying nanded news