Pangarpahad Village : असेही एक गाव! झाडा-झुडपांवर चढून शोधावे लागते मोबाइलचे नेटवर्क

‘ब्लॅक ॲण्ड व्हाइट’च्या स्वप्नातच जगताहेत पांगरपहाडवासीय
Pangarpahad Village
Pangarpahad Villagesakal

ईस्लापूर - भारत देश स्वतंत्र होऊन अनेक वर्षे झाली, तरी पांगरपहाड हे गाव मूलभूत सुविधांपासून कोसोदूर असल्याचे धक्कादायक चित्र आजच्या काळात या गावात दिसत आहे. या ‘फाइव्ह जी’ नेटवर्कच्या काळात या गावात साधे ‘टू-जी’ची सुविधा नाही. ॲण्ड्रॉइड मोबाइलचा तर या गावातल्या तरुणाईला गंधसुद्धा नाही.

किनवट तालुक्यातील शेवटच्या टोकाला वसलेल्या आणि चारीही बाजूने हिरवे माळ असलेल्या पांगरपहाड या गावात शासनाच्या सोयी-सुविधा पोचल्याच नाहीत. या गावात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने गावकरी गाव सोडून परराज्यात जाण्याच्या वाटेवर आहेत. येथे वैद्यकीय उपकेंद्राची इमारत तर आहे, पण त्यात एकही कर्मचारी हजर राहात नाही.

‘बीएसएनएल’चा टॉवर उभारण्यात आला असून अद्याप चालू नाही. गावापासून अर्ध्या किलोमीटर दूर जाऊन झाडावर चढून मोबाइलद्वारे संपर्क करावा लागत आहे. गावाला जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. पावसाळ्यात रस्त्याच्या पुलाची उंची कमी असल्याने गावाच्या चारही बाजूने पाणी वाहते, त्यामुळे पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो. मागे या परिस्थितीने अनेक जण मृत्युमुखी पडले. गावात अर्ध्या लोकांकडे रेशन कार्ड नाही. त्यामुळे शासनाच्या निधी व अनुदानित योजनेपासून हे गाव कोसोदूर असल्याची चर्चा मात्र होऊ लागली आहे.

गावात मोबाइलला रेंज नाही. त्यामुळे इतर गावांशी संपर्क करणे आमच्यासाठी कठीण आहे. शासनाचे अनुदान वेळेवर मिळत नाही, अर्धा गाव रेशन कार्डापासून वंचित आहे. येथे शासकीय वैद्यकीयची इमारत उभारण्यात आली असून, येथे एकही कर्मचारी राहात नाही. आदी बाबींमुळे आम्ही लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला.

- अर्जुन जाधव, माजी सरपंच, पांगरपहाड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com