सतरा वाळू डेपोंना पर्यावरणाची अनुमती
सतरा वाळू डेपोंना पर्यावरणाची अनुमतीSakal

Nanded News : सतरा वाळू डेपोंना पर्यावरणाची अनुमती; सात गाळमिश्रित वाळू डेपोंचा समावेश; यंत्राने गाळ काढण्‍यासाठी परवानगी

नवीन वाळू धोरणानुसार नांदेड जिल्ह्यात एकूण २४ वाळू डेपो प्रस्तावित करण्‍यात आले आहेत. त्यापैकी सात गाळमिश्रीत वाळू डेपोमधून गाळ काढण्‍यासाठी विशेष बाब म्‍हणून यंत्राच्‍या सहायाने परवानगी देण्‍यात आली आहे.

Nanded News : नवीन वाळू धोरणानुसार नांदेड जिल्ह्यात एकूण २४ वाळू डेपो प्रस्तावित करण्‍यात आले आहेत. त्यापैकी सात गाळमिश्रीत वाळू डेपोमधून गाळ काढण्‍यासाठी विशेष बाब म्‍हणून यंत्राच्‍या सहायाने परवानगी देण्‍यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध होईल तसेच अनधिकृत वाळू उत्खननाला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

राज्य शासनाने वाळू, वाळूचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केले आहे. या नवीन वाळू धोरणानुसार नांदेड जिल्‍‍ह्यात एकूण २४ वाळू डेपो प्रस्तावित करण्‍यात आले आहेत. यामध्‍ये बिलोली, देगलुर,

माहुर, हदगाव व हिमायतनगर तालुक्‍यातील १७ वाळू डेपो हे नियमित वाळू डेपोंना पर्यावरण अनुमती प्रदान करण्‍यात आली आहे. तर उर्वरित सात वाळू डेपो नांदेड व लोहा तालुक्‍यातील गाळमिश्रीत वाळू डेपो आहेत. या गाळमिश्रीत वाळू डेपोमधुन गाळ काढण्‍यासाठी विशेष बाब म्‍हणून यंत्राच्‍या सहायाने परवानगी देण्‍यात आली आहे.

नियमित वाळू डेपो

बिलोली तालुका ः येसगी, गंजगाव, कार्ला बुद्रुक, नागणी, माचनुर, सगरोळी, बोळेगाव, येसगी, हुनगुंदा. देगलूर तालुका ः तमलुर, मेद्दनकल्‍लुर, शेवाळा, शेळगाव, शेखापुर. हदगाव तालुका ः बेलमंडळ, गोर्लेगांव, बाभळी, बनचिंचोली, बेलमंडळ, गुरफळी. माहूर तालुका ः केरोळी, टाकळी, लांजी, कोळी, सायफळ. हिमायतनगर तालुका ः विरसणी, पिंपरी, कामारी, दिघी, घारापुर, रेणापुर, सिरपल्ली ज., डोलारी, बुंदली बे., कौठा, धानोरा ज., पळसपुर. उमरी तालुका ः बळेगाव.

गाळमिश्रित डेपो

नांदेड तालुका ः वाघी, रहाटी बु., सोमेश्‍वर, जैतापुर, थुगांव, हस्‍सापुर, कोटीतीर्थ, बोरगांव तेलंग. खुपसरवाडी, वाहेगांव, भणगी, गंगाबेट, असर्जन, विष्‍णुपुरी, मार्कंड, पिंपळगांव मि., कौठा. भायेगाव, राहेगाव, नागापुर, पुणेगाव, ब्राम्‍हणवाडा, त्रिकुट, बोंढार तर्फे हवेली, सिद्धनाथ, वांगी, किकी. लोहा तालुका ः बेटसांगवी, शेवडी, येळी, पेनुर, मारतळा, कौडगाव.

जिल्ह्यातील या वाळू घाटावर गाळ काढण्यासाठी यंत्राच्या सहाय्याने विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. या वाळू गटाव्‍यतिरिक्‍त इतरत्र ठिकाणावरुन गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी व मन्‍याड या नदीपात्रातुन उत्‍खनन होत असल्‍यास त्याबाबत रितसर तक्रार नोंदवावी.

- अभिजीत राऊत, जिल्‍हाधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com