सोयाबीनच्या अधीक उत्पादनासाठी ‘अशी’ करा पेरणी 

कृष्णा जोमेगावकर
बुधवार, 3 जून 2020

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत नांदेड तालुक्यातील गंगाबेटची सन-२०२०-२१ साठी निवड करण्यात आली. या कार्यक्रमतंर्गत बुधवारी (ता. तीन) बीबीएफ (रुंद सरी वरंबा) पद्धतीद्वारे सोयाबीन पेरणी प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

नांदेड : नानाजी देशमुख कृषी संजीवणी प्रकल्पातंर्गत नांदेड तालुक्यातील गंगाबेट गावामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून बुधवारी (ता. तीन) गंगाबेट प्रक्षेत्रावर बीबीएफ (रुंद सरी वरंबा) पद्धतीद्वारे सोयाबीन पेरणी प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पद्धतीमुळे सोयाबीनचे बियाणे एकरी वीस किलो लागते. यासोबतच उत्पदानामध्ये वाढ होते अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली. 

पोखरातंर्गत गंगाबेट गावाची निवड
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत नांदेड तालुक्यातील गंगाबेटची सन-२०२०-२१ साठी निवड करण्यात आली. या कार्यक्रमतंर्गत बुधवारी (ता. तीन) बीबीएफ (रुंद सरी वरंबा) पद्धतीद्वारे सोयाबीन पेरणी प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

हेही वाचा....ब्रेकिंग न्यूज - नांदेडला एका दिवसात २३ पॉझिटिव्ह

बीबीएफ पेरणी यंत्रामुळे अनेक फायदे  
उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव यांनी यावेळी शेतकऱ्यांना रुंद सरी वरंबा (बीबीएफ) पद्धतीद्वारे पेरणी केल्याने एकरी आठ ते दहा किलो बियाणांमध्ये बचत होते. जमिनीमधील अतिरिक्त पाण्याचा सरी मधून निचरा होतो. अवर्षण प्रवण कालावधीत पिकांस ओलावा उपलब्ध होतो. तसेच सोयाबीन पिकांची अधीक वाढ झाल्यानंतर फवारणी दरम्यान विषारी सापापासून संरक्षण मिळते, अशी त्यांनी माहिती दिली. 

हेही वाचलेच पाहिजे.... नांदेडमधील दोन मंडळात अतिवृष्टी.....कुठे ते वाचा

पेरणीपूर्वी करावी बिजप्रक्रीया
नांदेड तालुका कृषी अधिकारी बी. एस. शिंगाडे यांनी ट्रॅक्टरवरील बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध नसताना तिफणीने तीन ते चार ओळीनंतर एक सरी पाडावी, बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी असे सांगितले. शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. बीज प्रक्रियेमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव कमी होतो. उगवण चांगली होते असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.

शेतकऱ्यांनी दाखविले पेरणी प्रात्याक्षीक
नांदेड तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी आनंद तिडके बोंढारकर यांनी ट्रॅक्टरवर बीबीएफद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमाचे आयोजन मंडळ कृषी अधिकारी एस. एम. सावंत, गंगाबेटचे कृषी सहायक- वसंत जारीकोटे, समूह सहायक ए. एम. बेग उपस्थित होते. शेतकरी वीरभद्र अडगावकर यांच्या शेतावर पेरणी प्रात्याक्षीक करण्यात आले. 

कर्मचारी, लोकप्रतिनिधीसह शेतकरी उपस्थित
यावेळी प्रशिक्षण कार्यक्रमास कृषी सहायक चंद्रकांत भंडारे, गंगाबेटचे सरपंच संभाजी गोडबोले, पोलीस पाटील शिवाजी सोनटक्के, उपसरपंच बसवेश्वर मुक्तापुरे, तंटामुक्ती अध्यक्ष कोंडीबा सोनटक्के, लहू सोनटक्के, बळीराम सोनटक्के, राधाकिशन गोडबोले, महेश सोनटक्के, सदाशिव सोनटक्के, गजानन मोरे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For more soybean production, sowing on BBF