esakal | सकाळ इम्पॅक्ट : साडेआठ लाखाचे अवैध फटाके जप्त, वजिराबाद पोलिसांची मोठी कारवाई  
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तसेच दुकानाला सील ठोकले असून संबंधीत व्यापाऱ्यांवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी गुरुवारी (ता. २९) रात्री उशिरा केली.

सकाळ इम्पॅक्ट : साडेआठ लाखाचे अवैध फटाके जप्त, वजिराबाद पोलिसांची मोठी कारवाई  

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराच्या ह्रदयस्थानी असलेल्या वजिराबादमधील मारवाडी धर्मशाळा परिसरात विनापरवानगी ज्वलनशिल असलेले फटाके विक्री व साठा करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आठ लाख ३२ हजाराचे अनधीकृतपणे साठा करुन ठेवलेले फटाके जप्त केले. तसेच दुकानाला सील ठोकले असून संबंधीत व्यापाऱ्यांवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी गुरुवारी (ता. २९) रात्री उशिरा केली.

शहरामध्ये कायमस्वरूपी फटाका परवाना नसलेल्या एका व्यापाऱ्यांनी अतिशय गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच वजिराबाद भागात फटाके विक्री व साठा करून ठेवला असल्याने भविष्यात या परिसरातील नागरिकांच्या व शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहरातील वजिराबादमध्ये हे दुकान सुरू असून याठिकाणी फटाका विक्री व साठा करू नये असे वजिराबाद पोलिसांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी संबंधित व्यापाऱ्यास पत्र देऊन पळविले होते. त्यानंतरही त्यात सुधारणा न झाल्याने संबंधित दुकानाला सिल लावण्यात आले होते. मात्र दुकानदार हा कायद्याला धाब्यावर बसवत शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहे. फटाका दुकानाची महापालिकेच्या अग्निशामक व आणिबाणी विभागाकडून स्थळ पाहणी केली असता दुकानासाठी दर्शविण्यात आलेली इमारत ही मुख्य बाजारपेठेत असल्याने हा व्यापार बंद करावा असे संबंधीत व्यापाऱ्याला सांगितले होते.

हेही वाचा - चंद्र आहे साक्षीला : कोजागिरी पौर्णिमा आरोग्यासाठी आहे फलदायी -

संबंधितावर कायदेशीररित्या फौजदारी गुन्हा दाखल 

उच्च न्यायालयाचे आदेश व सूचनांचा विचार करता निवासी परिसरात फटाका खरेदी विक्री व साठा करण्यास परवानगी देणे ही बाब उचित नसल्याने तसा अहवालही देण्यात आला होता. ता. दोन ऑगस्ट २०१८ रोजी संबंधित व्यापाऱ्यास पत्र देऊन दुकान बंद करण्यास सांगितले होते. जिल्हाधिकाऱ्यांचे आणि पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत संबंधित व्यापारी बिनबोभाटपणे अवैध फटाका विक्री करत असून संबंधितावर कायदेशीररित्या फौजदारी गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी ॲड. प्रमोद नरवाडे आणि भाजपचे पंकज कांबळे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी वजिराबाद पोलिसांना आदेश दिल्यानंतर अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे क्लिक करा - ‘स्वारातीम’ विद्यापीठ परीक्षेचे निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होणार

वजिराबाद पोलिसांनीही जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता अहवाल

शहराच्या मुख्य ठिकाणी असलेल्या वजिराबादमधील फटाका विक्री व साठा करणारे दुकान बंद करण्यासाठी यापूर्वी वजिराबाद पोलिसांकडून संबंधीत दुकानावर कारवाई करण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनीही याबाबत निर्णय घेऊन दुकान बंद केले होते. संबंधीत दुकानदाराने दुकानाचे सील उघडून द्यावे मी भविष्यात दुसरा व्यवसाय करेन असे लेखी कळविले होते. त्यानंतर दुकान उघडून देण्यात आली. पुन्हा या दुकानादाराने फटाके व्किरी सुरु केल्याने त्याप्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यास आम्हास सुचीत करावे असे पत्र वजिराबाद पोलिसांकडून देण्यात आले होते. बाजारपेठेत ज्वलनशिल पदार्थ विक्री व साठा करुन ठेवणे हा गंभीर गुन्हा असल्याचे वजिराबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप शिवले यांनी सांगितले होते. संबंधीत व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असून गुरुवारी (ता. २९) रात्री कारवाई करुन दुकानातून साडेआठ लाखाचे फटाके जप्त करण्यात आले असल्याचे श्री. शिवले यांनी सांगितले. 

loading image
go to top