बापरे...! मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना लुटले, नांदेडात भितीचे वातावरण 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 7 October 2020

एका महिलेचे गंठण पळविणारा चोरटा वजिराबाद पोलिसांना अटक केला होता. तो पोलिस कोठडीत असतानाच पुन्हा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या तीन महिलांच्या अंगावरील जवळपास ९० हजाराचे सोन्याचे मंगळसुत्र (दागिणे) जबरीने तोडून नेले.

नांदेड : शहरात मागील किही दिवसांपासून रस्त्यावर जेष्ठ नागरिक किंवा महिलांना गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे किंवा किंमती मोबाईल लंपास, पर्स पळविणारी टोळी सक्रीय झाली आहे. दोन दिवसापूर्वीच शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका महिलेचे गंठण पळविणारा चोरटा वजिराबाद पोलिसांना अटक केला होता. तो पोलिस कोठडीत असतानाच पुन्हा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या तीन महिलांच्या अंगावरील जवळपास ९० हजाराचे सोन्याचे मंगळसुत्र (दागिणे) जबरीने तोडून नेले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती असी की, श्रीनगर येथील कुसुमबाई मोरे ह्या आपल्या अन्य मैत्रीणीसोबत नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करत होत्या. त्या आयटीआय ते महर्षी चौक दरम्यान जात असतांना शंकरराव चव्हाण पुतळ्याजवळ त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी चोरट्यांनी एकापाठोपाठ कुसुमबाई मोरे यांच्यासह त्यांच्या दोन मैत्रीणींच्या गळ्यातील मंगळसुत्र ( ८४ हजार ७७४ रुपये) जबरीने चोरुन नेले. महिलांनी आरडाओरडा करण्याच्या आतच दुचाकीवरुन चोरटे पसार झाले. 

हेही वाचा - एसीबीचा व्हाईस रेकॉर्डर घेऊन पळणारा लाचखोर पोलिस कोठडीत -

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेमुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी कुसुमबाई मोरे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्री. मुंडे करत आहेत. 

शेतीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी

बिलोली : शेतीच्या जुन्या वादातून भावकीतील दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बिलोली तालुक्यातील गागलेगाव शिवारात सोमवारी (ता. चार) सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामतीर्थ पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले. 
बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथील डुमणे परिवारात गेल्या काही वर्षापासून शेतीचा वाद सुरू आहे. दरम्यान ता. चार  ऑक्टोबर रोजी शिवाजी डुमणे, संजय डुमणे, अशोक डुमणे, अमोल डुमणे व चंद्रकांत डुमणे हे गागलेगाव शिवारात आमनेसामने आले. या दोन्ही गटातील आरोपींनी हातात कुर्‍हाड, काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली, या मारहाणीत काहीजण जखमी झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning walk women robbed, atmosphere of fear in Nanded