माता न तूं वैरिणी, चार दिवसाच्या ‘नकोशी’ला हॉटेलसमोर फेकून आईचे पलायन

file photo
file photo

माहूर ( जिल्हा नांदेड) : मुलगी पुन्हा एकदा नकोशी का झालीय? माहूर तालुक्यामध्ये हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. माहूर- किनवट राष्ट्रीय महामार्गावर अंजनखेड बस थांब्यावरील एका हॉटेलच्या टेबलवर तीन ते चार दिवसांचं स्त्री जातीचं बाळ आढळून आले. नवजात चिमुकलीला फेकून अज्ञात क्रूर मातेने पलायन केले. सुदैवाने या चिमुकलीची प्रकृती सध्या ठिक असून तिच्यावर माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेडला पाठविण्यात आले असून सिंदखेड पोलिसात अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माता न तूं वैरिणी... चा प्रत्यय आज (ता. १७) रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास माहूर तालुक्यातील अंजनखेड येथील बस थांब्यावरील घटनेत आला आहे. तीन ते चार दिवसाचे स्त्री जातीचे बाळ हॉटेलसमोरील टेबलवर अगदी व्यवस्थित रित्या स्वेटर टोपी घालून सोबतच बाळ टेबल वरुन पडू नये म्हणून आजूबाजूला टेकनची व्यवस्था लावून ‘नाकोशि’ला सोडून अज्ञात मातेने पळ काढला. सदर घटना अंजनखेड परिसरातील नसून कुणीतरी अज्ञात मातेने नियोजनपूर्वक प्रवासादरम्यान बाळाला सोडून दिल्याची चर्चा एकंदरीत ऐकायला मिळत आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास सदर घटना निदर्शनास आल्यानंतर अंजनखेड परिसरासह माहूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय टाकून देण्यात आलेला बाळ अनैतिक संबंधातून जन्माला आले किंवा मग मुलगीच नको होती. हे सध्या तरी अस्पष्ट आहे. पुरोगामी महाराष्ट्र राज्यात मुलगा- मुलगी समान असल्याचे धडे गिरवीत असतानाच नकोशीला फेकून देण्यात आल्याने मुलगी कधीच नकोय हे पुन्हा एकदा या घटनेकडे पाहून सिद्ध होते.

अंजनखेड उपकेंद्राच्या आरोग्य सेविका भारती भेंडे व स्थानिकांच्या मदतीने त्या बाळाला ग्रामीण रुग्णालय माहूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यकंटेश भोसले, डॉ. किरण कुमार वाघमारे यांनी उपचार केले. परंतु बाळाचे वजन अतिशय कमी असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे. सध्या ती नवजात नकोशी सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली असून सिंदखेड पोलिस ठाण्यामध्ये अज्ञातविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. त्या क्रूर मातेचा शोध सुरु आहे.   

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com