Motivational Story : प्रतिकुल परिस्थितीवर मात करत शेख जुनेद या दिव्यांगाची एमबीबीएसला गवसणी

file photo
file photo

नांदेड : घरात अठरा विश्व दारिद्र्य, त्यामुळे सुरवातीपासूनच शिक्षणाला अडथळे, पोटाला पीळ देऊन पालकांनी आपल्या या दिव्यांग मुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी हाती पडेल ते काम करुन त्याला अभ्यासात कुठे कमतरता जाणू दिली नाही. या मुलानेही आपल्या पाल्याचा खर्च वाया जावु दिला नाही. त्याने कठीण परिश्रम करत चक्क वैद्यकिय क्षेत्रात भरारी घेतली. कितीही संकटे आले तरी आपले मन विचलीत न होऊ देता त्यावर मात केली तर नक्कीच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो असे मत दिव्यांग शेख जुनेद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हदगाव शहरात गरीब घराण्यात जन्म घेतलेल्या शेख जुनेद या दिव्यांगाचे वडिल अॅटो चालवुन आपला व आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह भागवतात. जन्मत: च दिव्यांग असलेल्या जुनेदला अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जिवाचे रान करावे लागले. तरीसुद्धा प्रमाणपत्र मिळाले नव्हते. तेंव्हा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे मराठवाडा अध्यक्ष फेरोजखांन महंमद अलीखान यांना संघटनेचे हदगाव तालुका अध्यक्ष निहाल पटेल यांनी सविस्तर कळविले. 

फेरोज खांन यांनी कुठलीच पर्वा न करता शेख जुनेद यांना थेट नांदेड येथील डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नेऊन अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढुन देण्यात मोठा वाटा उचलला. त्याचेच फलीत म्हणुन शिक्षणात हुशार असलेला दिव्यांग शेख जुनेद यांने थेट वैद्यकीय क्षेत्रात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या एमबीबीएसलाच मजल मारत गोरगरीब आई वडील भाऊ बहीण यांचे नाव उज्वल केले. याच्याच अनुषंगाने ता. १७ नोव्हेंबर रोजी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती हदगावकडुन मराठवाडा अध्यक्ष फेरोज खांन महंमद अली खान यांनी मौलाना अब्दुल कलाम आझाद शादिखाना येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षपदी पत्रकार शेख चांद पाशा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे यांच्यासह हदगाव तालुका अध्यक्ष निहाल पटेल व समीतीचे पदाधिकारी आणि हदगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. सर्वांनी आप- आपल्या स्तरावरून मनोगत व्यक्त करून शेख जुनेद या दिव्यांगांस पुढिल शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com