esakal | खासदार चिखलीकर यांची कोरोनावर मात; भेटीसाठी येऊ नका- भाजप 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

रुग्णालयातुन डिस्चार्ज झाल्यानंतर  गुरुवारी (ता. २०) सकाळी विमानाने नांदेडला येत आहेत. तेव्हा कोणीही भेटण्यासाठी येऊ नये, गर्दी करू नये असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

खासदार चिखलीकर यांची कोरोनावर मात; भेटीसाठी येऊ नका- भाजप 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : परमेश्वर व जनतेचा आशीर्वाद पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळेच कोरोनाच्या संसर्गातुन जिल्ह्याचे    खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. रुग्णालयातुन डिस्चार्ज झाल्यानंतर  गुरुवारी (ता. २०) सकाळी विमानाने नांदेडला येत आहेत. तेव्हा कोणीही भेटण्यासाठी येऊ नये, गर्दी करू नये असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

खासदार प्रतापराव पाटील यांना वाढदिवसाच्या दुसऱ्याचं दिवशी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते या काळात पंतप्रधान कार्यालयातून खासदार चिखलीकर यांच्या स्वास्थ्याबाबत वेळोवेळी विचारणा करण्यात आली. पीएमओ ऑफिस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, रेल्वे मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री, हंसराज अहिर केंद्रीय मंत्री, मंत्री एकनाथ शिंदे व अनेक वरिष्ठ अधिकारी, यासह संसदेतील सहकारी खासदार, आमदार मित्रपरिवार तसेच एखादा नेता वगळता केंद्रीय व राज्यातील विविध पक्षाचे नेते, सामाजिक, प्रशासकीय, व्यापारी, पत्रकार, विविध क्षेत्रातील मित्रपरिवार जिल्ह्यातील कार्यकर्ते, आप्तस्वकीय यांनी भ्रमणध्वनीद्वारे सदिच्छा व्यक्त केल्या.

हेही वाचा महाआघाडीतील खासदार व आमदारामध्ये पाण्यावरुन कलगीतुरा, कुठे ते वाचा...?

सुख दुःखात धावून जाणारे खंबीर नेतृत्व 

जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अभिषेक, नवस, उपवास करत देवाकडे अल्लाह प्रार्थना केली. कोरोना काळात गेली साडेचार महिने खा. चिखलीकर हे अविरतपणे लोकांच्या मदतीला धावून गेले. एवढेच नव्हे तर कोरोनाची संसर्ग झाल्यानंतर उपचार सुरू असताना रुग्णालयातुही त्यांनी जनतेच्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या. सुख दुःखात धावून जाणारे खंबीर नेतृत्व प्रतापराव या काळात प्रसिद्धीपासून मात्र दूर राहिले.

भेटीसाठी सध्यातरी येऊ नये 

कोरोनाचा संसर्ग माझ्या एकट्यालाच झाला नाही तर तो देशात, राज्यात अनेक मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी सामान्य जनता याना झाला आहे. मी या संसर्गातुन आता चांगला झालो आहे माझी प्रकृती ठणठणीत झाली असून गुरुवारी विमाने नांदेडला येत आहे तेव्हा कार्यकर्ते, आप्तस्वकीय, मित्रपरिवार यांनी भेटण्यासाठी येऊ नये गर्दी करू नये कोरोनाच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. भेटीसाठी सध्यातरी येऊ नये असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

loading image